धुळे - जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 11 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ झाली आहे. यात शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातून आलेल्या 14 अहवालांपैकी 7 अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शिरपूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज 11 रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 131 वर पोहोचला आहे.
गेल्या 24 तासांत 13 रुग्ण वाढल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ झाली आहे. यात शिरपूर येथील सातही रुग्ण एकाच घरातील असून, यामुळे शिरपूरकरांची चिंता वाढली आहे. धुळे जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 131 झाल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. एकीकडे राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने सक्तीचा लॉकडाऊन जाहीर केलेला असतानादेखील शिरपूर शहरात या लॉकडाऊनचे तीनतेरा वाजले आहेत. मात्र, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असून, नागरिक सर्रासपणे घराबाहेर पडत आहेत. या नागरिकांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे.
धुळ्यात एकाच दिवशी आढळले 11 कोरोनाबाधित, एकूण संख्या 131 वर - धुळे कोरोना न्यूज
धुळे जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 11 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ झाली आहे.