धुळे - जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वायपूर येथील तीन रुग्णांचा अहवाल कोरोनासाठी पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या 105 झाली आहे. वाढत्या कोरोना बाधितांमुळे आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन हादरले आहे.
धुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आताच मिळालेल्या माहितीनुसार शिंदखेडा तालुक्यातील वायपूर येथील तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 18 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या 105 पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून, 57 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गेल्या 2 दिवसात कोरोना बधितांचा आकडा वाढला असून, यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा हादरली आहे. वाढत्या कोरोना बधितांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात आणि जिल्ह्यात लॉकडाऊनचा फज्जा उडाला असून, नागरिकांची शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे चित्र आहे.