धुळे - जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील शिरपूर-चोपडा रस्त्यावर जामनेर येथून पानसेमल येथे जाणाऱ्या क्रूझर गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात १३ जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी शिरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - पोलीस वेळीच आले अन् अनर्थ टळला
शिरपूर तालुक्यातील शिरपूर-चोपडा रस्त्यावरील बभळाजजवळ जामनेर येथून पानसेमल येथे जाणाऱ्या क्रुझर गाडीच्यासमोर (MH १५ CM ३९९०) रस्त्यावर दगड आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून गाडी रस्त्याच्या कठड्यावरून पुलाच्या खाली पडली. यात गाडीच्या चालकसह १३ जण जखमी झाले. या अपघातात क्रुझर गाडीचा चक्काचूर झाला असून अपघातातील जखमींना ग्रामस्थांनी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. यात तीन ते चार जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे.