ETV Bharat / state

चालत्या कारने घेतला पेट, सुदैवानं जीवितहानी नाही

शिरपूर तालुक्यातील अजनाड बंगला जवळ कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कारने घेतला पेट
author img

By

Published : Jul 28, 2019, 1:44 PM IST

धुळे- शिरपूर तालुक्यातील अजनाड बंगला जवळ कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. गावकऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यात आली.

जळगाव येथील रामचंद्र शेवंदास विराणी हे त्यांच्या पत्नी व मुलीसोबत शिरपूर येथे काळूमातेच्या दर्शनासाठी सकाळी जळगाव येथून निघाले होते. सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्यांच्या स्विफ्ट डिझायर चार चाकी वाहनाने पेट घेतला. वाहनाला आग लागल्याचे समजताच वाहनातले सर्व जण बाहेर निघाले व काही क्षणात संपूर्ण गाडी जळून खाक झाली.

शहादा बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरील अजनाड बंगला गावाजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे गाडीत बसलेले संपूर्ण कुटुंब भयभीत झाले होते. विशेष म्हणजे पाऊस सुरू असताना या वाहनाला आग लागली होती. यामुळे रस्त्यावरील सुमारे १ किमी पर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. कारला आग लागण्याचे कारण समजु शकले नाही.

Intro:शिरपूर तालुक्यातील अजनाड बंगला जवळच द बर्निंगची कारची दुर्घटना रविवारी सकाळी घडली़. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे़ गावकºयांच्या मदतीने कार विझविण्यात आली़ जळगाव येथील रामचंद्र विराणी आपल्या कुटुंबियांसमवेत एमएच १९ - ४४१९ क्रमांकाच्या कारने शिरपूर येथे देवदर्शनासाठी जात असताना ही घटना घडली. Body: जळगांव येथील रामचंद्र शेवंदास विराणी हे त्यांच्या पत्नी व मुलीसोबत शिरपूर येथे काळूमातेच्या दर्शनासाठी सकाळी जळगाव येथून निघाले होते.सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या स्विप्ट डिझायर चार चाकी वाहनाने पेट घेतला.वाहनाला आग लागल्याचे समजताच वाहनातले सर्व जण बाहेर निघाले पळाले व काही क्षणात संपूर्ण गाडी जळून खाक झाली.शहादा बर्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरील अजनाड बंगला गावाजवळ हि घटना घडली.यामुळे गाडीत बसलेले संपूर्ण कुटूंब भयभीत झाले होते.विशेष म्हणजे पाऊस सुरु असतांना या वाहनाला आग लागली.यामुळे रस्त्यावरील सुमारे १ किमी पर्यंत वाहनाची कोंडी झाली होती.वाहनाला अचानक आग लागल्याने कारण समजु शकले नाही. दरम्यान नागरिकांच्या मदतीने हि आग विझविण्यात आली.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.