धुळे- शहरातील जुने धुळे भागातील तरुण पांझरा नदीत वाहून गेल्याची घटना बुधवारी सकाळी घडली होती. या तरुणाचा मृतदेह देवपूर पोलीस ठाण्याच्या समोर आढळून आला आहे. त्याचा मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला.
हेही वाचा- अजित पवारांसह अन्य नेत्यांवर ईडीची कारवाई कायदेशीरच - माधव भांडारी
धुळे शहरातील पांझरा नदी पात्रात अक्कलपाडा धरणासह विविध प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदीला पूर आलेला आहे. या पुरात जुने धुळे भागातील श्याम हिरामण चित्ते हा (32 वर्षीय) तरुण वाहून गेल्याची घटना बुधवारी सकाळी घडली होती. श्यामचा मृतदेह शोधण्याचे काम सकाळपासून सुरू होते. अखेर पांझरा नदी काठावरील देवपूर पोलीस ठाण्याच्या समोर त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच नागरिकांनी नदीकाठी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. मात्र, माहिती देऊन देखील एकही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते. यामुळे स्थानिक नागरिकांच्या मदतीने श्यामचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी नदीकाठी गर्दी केली होती.