ETV Bharat / state

विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांची शिकवण देणे गरजेचे; धुळ्यातील शिक्षकांच्या प्रतिक्रिया - ekvira collage dhule

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त शहरातील एकविरा माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांशी 'ईटीव्ही भारत'ने चर्चा केली.

एकविरा माध्यमिक विद्यालय
author img

By

Published : Sep 5, 2019, 11:22 PM IST

धुळे - विद्यार्थ्यांच्या बुद्धीला आकार देण्याचे पवित्र काम शिक्षक करत असतात. मुले पालकांकडे कमी आणि शिक्षकांच्या सहवासातच जास्त असतात. शिक्षक देखील त्याला मायेने शिक्षणाचे, संस्कृतीचे आणि आचार-विचाराचे डोस पाजत असतात. मात्र, सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना घडवताना शिक्षकांसमोर प्रचंड आव्हाने निर्माण होत आहेत. शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या पालकांची, सरकारी धोरणांची आणि वेळप्रसंगी विद्यार्थांची देखील मर्जी संपादन करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांची शिकवण देणे गरजेचे असल्याची भावना धुळे शहरातील एकविरा देवी माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

एकविरा माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांशी 'ईटीव्ही भारत'ने चर्चा केली

हेही वाचा - अभिनव शिक्षन संस्थेने 'शिक्षक आपल्या दारी' अभियान राबवून केला शिक्षक दिन साजरा

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिनानिमित्त धुळे शहरातील एकवीरा देवी माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांशी 'शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासमोरील आव्हाने' यावर 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला. सद्यस्थितीत विद्यार्थी आणि शिक्षकांमधील दरी वाढत चालली आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन गुणांवरती होऊ लागले आहे. त्यामुळे विद्यार्थी हे गुणवंत होण्याऐवजी मार्कवंत होत आहेत. वाढत्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांची शिकवण देणे अत्यंत गरजेचे झाले आहे, असा येथील शिक्षकांचा सूर होता.

Intro:आज विद्यार्थ्यांना घडवताना शिक्षकांसमोर प्रचंड आव्हान आहेत, विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांची शिकवण देणे गरजेचे आहे, अस मत धुळे शहरातील एकविरा देवी माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केलं.

Body:डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या शिक्षक दिनानिमित्त धुळे शहरातील एकवीरा देवी माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांशी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासमोरील आव्हाने याबाबत ईटीव्ही भारतच्या माध्यमातून संवाद साधला असता, आज विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी वाढली आहे, विद्यार्थ्यांचे मूल्यांकन हे गुणांवरती होऊ लागले आहे. यामुळे विद्यार्थी हे गुणवंत होण्याऐवजी मार्कवंत होताहेत, आज वाढत्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांची शिकवण देणे अत्यंत गरजेचे झाले आहे असे मत एकवीरा देवी माध्यमिक विद्यार्थी शिक्षकांनी यावेळी व्यक्त केले

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.