ETV Bharat / state

धुळ्यातील सोनवद धरण अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत; प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचा फटका - पाण्याचा विसर्ग

एकीकडे धुळ्यातील पांझरा नदीला महापूर आला आहे. तर दुसरीकडे मात्र शिंदखेडा तालुक्यातील सोनवद प्रकल्प अजूनही कोरडाठाक पडला आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे हा प्रकल्प आजही कोरडाठाक आहे. हा प्रकल्प भरला न गेल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी दिला आहे.

प्रशासनाच्या नियोजनशुन्यतेचा फटका
author img

By

Published : Aug 6, 2019, 9:41 AM IST

धुळे - एकीकडे धुळ्यातील पांझरा नदीला महापूर आला आहे. तर दुसरीकडे मात्र शिंदखेडा तालुक्यातील सोनवद प्रकल्प अजूनही कोरडाठाक पडला आहे. या प्रकल्पातून शिंदखेडा आणि धुळे तालुक्यामध्ये पाणीपुरवठा होतो. परंतु, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे हा प्रकल्प आजही कोरडाठाक आहे. हा प्रकल्प भरला न गेल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी दिला आहे.

सोनवद धरण अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत

धुळे जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पांमधील पाण्याचा विसर्ग पांझरा नदी पात्रात करण्यात आला. त्यामुळे नदीला पूर आला असून धुळे शहरास अन्य तालुक्यांचा पाणी प्रश्न पूर्णपणे मिटला आहे. मात्र अजूनही तालुक्यातील सोनवद प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. कारण पांझरा नदी पात्रात विसर्ग करण्यात आलेले पाणी सोनवद प्रकल्पाकडे वळवण्यात आले नाही. त्यामुळे हा प्रकल्प पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. सोनवद प्रकल्पातून धुळे तालुका आणि शिंदखेडा तालुक्याला पाणीपुरवठा केला जातो. विशेष म्हणजे हा प्रकल्प तयार झाल्यापासून फक्त ३ वेळा भरण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून २१ गावांच्या पाणीपुरवठा योजना, शिंदखेडा पाणी पुरवठा योजना यासह अन्य योजना राबवल्या जातात. मात्र प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे हा प्रकल्प आजही कोरडाठाक आहे.

पांझरा कालव्याची वेळोवेळी साफसफाई होत नसल्याने या धरणात पाणी सोडले जात नाही. कालव्याची साफसफाई करून सोनवद धरण भरवण्यात यावे अशी मागणी करत येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या वतीने सोमवारी निदर्शने देण्यात आले. सोनवद प्रकल्प भरला न गेल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी दिला आहे.

Intro:एकीकडे धुळ्यात पांझरा नदीला महापूर असतांना दुसरीकडे मात्र शिंदखेडा तालुक्यातील सोनवद प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. या प्रकल्पातून शिंदखेडा आणि धुळे तालुक्याचा पाणी प्रश्न मिटण्यास मदत होते मात्र असं असतांना देखील प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे हा प्रकल्प आजही कोरडाठाक आहे. हा प्रकल्प भरला न गेल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी दिला आहे.
Body:धुळे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील काही प्रकल्पांमध्ये निर्माण झालेला पाणीसाठा पांझरा नदी पात्रात विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे नदीला पूर आला असून यामुळे धुळे शहर आणि अन्य तालुक्यांचा पाणी प्रश्न पूर्णपणे मिटला आहे. मात्र असं असताना शिंदखेडा तालुक्यातील सोनवद प्रकल्प मात्र कोरडाठाक पडला आहे. पांझरा नदी पात्रात विसर्ग करण्यात आलेलं पाणी सोनवद प्रकल्पाकडे वळवण्यात न आल्याने हा प्रकल्प पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. सोनवद प्रकल्पातून धुळे तालुका आणि शिंदखेडा तालुक्याला पाणीपुरवठा केला जातो. विशेष म्हणजे हा प्रकल्प तयार झाल्यापासून फक्त ३ वेळा भरण्यात आला आहे. या प्रकल्पावर २१ गाव पाणीपुरवठा योजना, शिंदखेडा पाणी पुरवठा योजना यासह अन्य योजना राबवल्या जातात, मात्र प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे हा प्रकल्प आजही कोरडाठाक आहे. पांझरा कॅनॉलची वेळोवेळी साफसफाई होत नसल्याने या धरणात पाणी सोडलं जात नाही, कॅनॉलची साफसफाई करून सोनवद धरण भरण्यात यावं अशी मागणी करत येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या वतीने सोमवारी निदर्शने करण्यात आली. सोनवद प्रकल्प भरला न गेल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी दिला आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.