धुळे - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात धुळे शहरात आंदोलन सुरू असताना आंदोलकांकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच आंदोलनकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंददरम्यान बुधवारी धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील शंभर फुटी रोड या भागात आंदोलन कर्त्यांनी दगडफेक केली. तसेच पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली होती. आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर हल्ला देखील करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलनकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.