धुळे - कोरोना नंतर धुळे जिल्ह्यासह शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. त्यामुळे, रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर वर आला आहे.
हेही वाचा - प्रवीण दरेकर यांच्या 'त्या' वक्तव्यावर धुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक
कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत समाजवादी पक्षाच्या वतीने अनेक निवेदने जिल्हा रुग्णालय प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, रुग्णालय प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नगरसेवक अमीन पटेल यांनी केला आहे.
अन्यथा कार्यालयात कचरा टाकू
येणाऱ्या काळात हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तर, जिल्हा रुग्णालयातील अधिष्ठाता पल्लवी सापळे यांच्या कार्यालयात कचरा फेको आंदोलन करण्यात येईल, असा गंभीर इशारा अमीन पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
हेही वाचा - वेतन न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; कर्मचारी करणार आंदोलन