धुळे - महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील मतदार प्रक्रिया पार पडत आहे. धुळे मतदार संघातही सकाळपासूनच शांततेत मतदान पार पडत आहे. हे मतदान पार पडत असतानाच शहरातील उन्नती विद्यालयात उभारण्यात आलेले सखी मतदान केंद्र आकर्षणाचा विषय ठरले आहे.
मतदानाचा टक्का वाढवा तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना राबवल्या आहेत. शहरातील उन्नती विद्यालयात उभारण्यात आलेले सखी मतदान केंद्र महिलांसाठी आकर्षणाचा विषय ठरले आहे. याठिकाणी महिलांसाठी विविध सोयी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
महिलांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन याठिकाणी करण्यात आले. या मतदान केंद्रांवरील स्वयंसेविकाशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी...