ETV Bharat / state

Raosaheb Danve Attack On Sanjay Raut : संजय राऊत म्हणजे पिंजऱ्यातला पोपट, मालक दिसल्यावरच 'टिव टिव' करतो; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल - गृहमंत्री अमित शाह

Raosaheb Danve Attack On Sanjay Raut : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. संजय राऊत म्हणजे पिंजऱ्यातला पोपट आहे. मालक पाहिल्यावरच टिव टिव करतो, असा हल्लाबोल रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांच्यावर धुळ्यात केला.

Raosaheb Danve Attack On Sanjay Raut
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 3:10 PM IST

दानवे यांची प्रतिक्रिया...

धुळे Raosaheb Danve Attack On Sanjay Raut : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे संभाजीनगरात येणार असल्यानं मनोज जरांगे पाटलांचं उपोषण गुंडाळल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. या आरोपाचा आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांनी चांगलाच समाचार घेतला. संजय राऊत म्हणजे पिंजऱ्यातला पोपट आहे, मालक दिसल्यावरच टिव टिव करतो, असा हल्लाबोल रावसाहेब दानवे यांनी यावेळी शिंदखेड्यात केला.

काय केला होता संजय राऊतांनी आरोप : छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार आहेत. त्यामुळे भाजपा सरकारनं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण गुंडाळलं, असा आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता. मात्र मनोज जरांगे पाटील हा मागं हटणारा कार्यकर्ता नाही, असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगतिलं होतं.

रावसाहेब दानवेंनी काय केला हल्लाबोल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि मी स्वतः मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी रात्री गेलो होतो. त्यावेळी हे दरवाजा बंद करून झोपले होते, असा हल्लाबोल रावसाहेब दानवे यांनी संजय राऊतांवर केला. मराठा आरक्षणाच्या मागण्या आम्ही मान्य केल्या असून दिलेल्या आश्वासनाप्रमाणं कार्यवाही करण्याची वाटचाल सुरू आहे. पण यांनी कधी तोंड दाखवलं नाही. हा फक्त पिंजऱ्यातला पोपट आहे, मालक आल्यावरच टिवटिव करत असतो. उद्धव ठाकरे दिसल्याशिवाय काही बोलतच नाही असा हल्लाबोल रावसाहेब दानवे यांनी केला. पिंजऱ्यातले पोपट काय बोलतील, याच्याशी आम्हाला काही घेणंदेणं नाही, अशी बोचरी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.

शिंदखेड्यात लवकरच एक दिवसाआड पाणीपुरवठा : नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे शहराला पुढील काळात पाच ते सहा दिवसाआड नाही, तर एक दिवसाआड पाणीपुरवठा होईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते 21 कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

शहरात पंधरा दिवस येत नव्हते नळाला पाणी : आमदार जयकुमार रावल यांनी यावेळी विरोधकांवर सडकून टीका केली. राज्यात युती शासनाच्या काळात 21 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. शहरात काही वर्षांपूर्वी पंधरा-पंधरा दिवस नळाला पाणी येत नव्हते. मात्र पुढील काळात शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. तर गेल्या 40 वर्षांपासून रखडलेल्या सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेस निधी मिळवून दिला. 2024 पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

उधना-पाळदी 'मेमू' भुसावळपर्यंत धावली : पश्चिम रेल्वेच्या सूरत-भुसावळ मार्गावर धावणाऱ्या उधना-भुसावळ 'मेमू' गाडीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी सायंकाळी दोंडाईचा रेल्वे स्थानकावर हिरवी झेंडी दाखविली. सुमारे 800 प्रवाशांना घेऊन ही गाडी रात्री सव्वा दहाच्या सुमारास भुसावळला पोहोचली. दरम्यान, पुढील वर्षात देशात चारशे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येतील, अशी घोषणा रावसाहेब दानवे यांनी कार्यक्रमात केली. उधना-पाळधी दरम्यान धावणारी मेमू गाडी जळगावपर्यंत नेण्याची प्रवाशांची मागणी होती. ती मान्य करताना ही गाडी भुसावळपर्यंत नेण्याचा निर्णय झाला होता. दरम्यान, लवकरच पश्चिम रेल्वे लाईनवरील प्रवाशांसाठी पुण्याला जाण्यासाठी नवीन गाडी सुरू करण्यात येणार असल्याचंही रावसाहेब दानवे यांनी यावेळी सांगितलं.

यांची होती कार्यक्रमाला उपस्थिती : या कार्यक्रमाला खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, धुळ्याचे माजी महापौर प्रदीप कर्पे, शिंदखेडा नगरपंचायतीचे गटनेते अनिल वानखेडे, नारायण पाटील, नगराध्यक्षा रजनी वानखेडे, कामराज निकम, जिल्हा परिषद सभापती महावीरसिंह रावल, संजीवनी सिसोदे, पंचायत समिती सभापती वंदना ईशी, उपसभापती रणजीत गिरासे, भिला माळी, प्रकाश देसले, उल्हास देशमुख, युवराज माळी, सुभाष माळी, मीरा मनोहर पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण माळी, चेतन परमार, जितेंद्र जाधव, किसन सकट, चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. Raosaheb Danve : मोदी सरकारच्या काळात रेल्वेला 'अच्छे दिन' - रावसाहेब दानवे
  2. Raosaheb Danve On Lathicharge: वातावरण पाहून परिस्थिती हँडल केली, पण जालना पोलिसांचा लाठीचार्ज चुकीचाच- रावसाहेब दानवे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.