धुळे - केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Union Defense Minister Rajnath Singh) यांनी धुळ्यात पाकिस्तानला गंभीर इशारा दिला. घुसखोरी करणाऱ्यांना आम्ही आमच्या देशात मारू शकतो, तर त्यांच्या देशात घुसून देखील मारण्याची हिंमत आम्ही ठेवतो, असं म्हणत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान व चीनला (Rajnath Singh warns Pakistan and china) गंभीर इशारा दिला आहे. सर्व बदलू शकतात परंतु शेजारी कधीच बदलू शकत नाही, असं म्हणत राजनाथ सिंह यांनी आम्ही भारतमातेचे मस्तक झुकू देणार नाही, असे म्हणत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर निशाणा (Union Defense Minister Rajnath Singh warns Pakistan) साधला आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज धुळे जिल्ह्याच्या (Rajnath Singh in dhule) दोंडाईचा दौऱ्यावर आले होते. यावेळी मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते दोंडाईचा शहरातील शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह महाराणा प्रताप व अब्दुल हमीद यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दोंडाईचाकरांशी भाषणाच्या माध्यमातून संवाद साधताना मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वात प्रथम मराठी भाषेतून संबोधित केले. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी यापूर्वीच्या सरकारने जाहीरनाम्यात दिलेले वचन पूर्ण केली नसल्याचे म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला. त्याचबरोबर भाजपतर्फे 2014 मध्ये दिलेल्या जाहीरनाम्यातील सर्व वचन पूर्ण केले असल्याचे ते म्हणाले.
मोदींच्या संकल्पनेतून साकारत आहे भव्य-दिव्य राम मंदिर -
राम मंदिराबाबत बोलताना मंत्री राजनाथ सिंग म्हणाले की, (Rajnath Singh on ram mandir) विरोधक आमच्यावर टीका करत होते कि, राम मंदिराच्या फक्त बाता केल्या जात आहेत, त्यावर कुठल्याही प्रकारची कृती केली जात नाही. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भव्यदिव्य राम मंदिर उभारण्याचे काम सुरू झाले आहे.
राजनाथ सिंहांचा काँग्रेसवर निशाणा -
आश्वासन देणे आणि ते पूर्ण करणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून जर तेव्हाच्या सरकारने थोडी जरी आश्वासनांची पूर्तता केली असती तर भारत शक्तिशाली देश म्हणून पुढे आला असता, असे म्हणत मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर (Rajnath Singh on Congress) निशाणा साधला आहे.
2014 पासून 2019 पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सरकारने चांगले काम केले आहे. आमचे सरकार असो किंवा कुठल्याही पक्षाचे सरकार असो आम्हाला विकास साधायचा आहे, असे देखील यावेळी मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.