ETV Bharat / state

Prakash Ambedkar on Pm Modi : प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका; म्हणाले... - PM Modi

Prakash Ambedkar on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते गुरुवारी शिर्डीत विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि काही प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात आलं. यासाठी पंतप्रधान मोदी हे शिर्डीत आले होते. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मात्र या दौऱ्यावर टीका केली आहे.

Prakash Ambedkar on PM
प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 9:55 PM IST

Updated : Oct 27, 2023, 9:08 AM IST

प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका

धुळे Prakash Ambedkar on Pm Modi : पंतप्रधानांचा सरपंच झाल्यावर आपण काय करणार, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर बोचरी टीका केली. केवळ चमकोगिरी केल्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अन्य कोणतेही काम नाही. त्यामुळं आगामी निवडणुकांमध्ये देशातील जनतेने त्यांना घरी पाठवावे, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं.

मोदींवर केली टीका : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:च्या चेहऱ्यात एवढे अडकले की, त्यांना कुणाचाच चेहरा चालत नाही. आपले व्यक्तिमत्व इतर चेहऱ्यामुळे झाकले जाईल अशी भीती मोदींना वाटते. म्हणून ते फक्त स्वत:चाच चेहरा दाखवितात, अशी टीका 'वंचित'चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत केली.

मोदींनी स्वत:ची अवस्था सरपंचासारखी केली : आंबेडकर म्हणाले की, भाजपा स्वत:ला हिंदूंचे सरकार म्हणते. मात्र वर्षभरात एक लाख तेरा हजार हिंदुंनी देश सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे. याबाबत मात्र, सनातन धर्माचे प्रचारक बोलत नाही. सनातन हेच हिंदुंना त्रास देतायेत. मोदींचा खोटा प्रचार आरएसएस करते. जी 20 परिषदेवर कोट्यावधीचा खर्च केला. यामागे मोदी हे देशाचेच नव्हे तर जगाचे नेते आहेत असा प्रचार करण्याचा हेतू होता. मात्र, मोदींची जो बायडेन यांनी चांगलीच फजिती केली. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, केजरीवाल विचारत असलेली डिग्री मोदी दाखवत नाहीत. यावरुन मोदींना इंग्रजी येत नाही याला पुष्टी मिळते. सत्तेसाठी भाजप समाजाला दुभंगत ठेवत आहेत. मोदींनी स्वत:ची अवस्था सरपंचासारखी केली आहे. गावात काहीही झाले की सरपंच म्हणतो मीच केले. तसे मोदी सरपंच झाले आहेत. मराठा समाज व आरक्षणाबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, निजामी मराठा रयतेच्या मराठा समाजाला स्वीकारत नाही हा एक जातीयवादच आहे.

प्रकाश आंबेडकर धुळे दौऱ्यावर : आदिवासी एल्गार परिषदेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) गुरुवारी धुळे दौऱ्यावर आले होते. धुळे शहरातील साक्री रोडवर विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात होणाऱ्या आदिवासी एल्गार सभेला संबोधित करण्याआधी त्यांनी गुलमोहर शासकीय विश्रामगृहात प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.

ओबीसी आणि मराठा संघर्ष : सत्ता हस्तगत करण्यासाठी आरएसएस आणि भाजपा जाती-धर्मात व समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. धनगर आणि कोळी समाज आदिवासी आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत. तर मराठा समाज देखील आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहे. याचा गैरफायदा घेत आरएसएस आणि भाजपा मिळून धनगर आणि कोळी समाजाचा आदिवासींशी संघर्ष पेटवून दिला आहे. तसेच मराठा समाजात गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा अशी दुही निर्माण केली जात आहे. शिवाय ओबीसी आणि मराठा असा संघर्षही यांनीच लावून दिला आहे. निवडणुकांच्या आधी दुही निर्माण करून वातावरण खराब करण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकार करत आहे. मणिपूरमध्ये हिंदू आदिवासींना हाताशी धरून ख्रिश्चन आदिवासींचा नरसंहार करण्यात आला. तेथील परिस्थिती अतिशय टोकाला गेली. तशाच पद्धतीने विविध समाजात तेढ निर्माण व्हावा यासाठी महाराष्ट्रात देखील प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

हेही वाचा -

  1. Nitesh Rane On Uddhav Thackeray: जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी उद्धव ठाकरेंच कारस्थान - नितेश राणेंचा आरोप
  2. Maratha Reservation Row : सदावर्तेंच्या गाड्यांच्या तोडफोडीवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले पाहा व्हिडिओ
  3. Sanjay Raut on PM Modi Shirdi visit: पंतप्रधानांच्या शिर्डी दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका, म्हणाले...

Last Updated : Oct 27, 2023, 9:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.