ETV Bharat / state

पंजाबहून पिस्तूल विकण्यासाठी आलेले तीन संशयित जेरबंद; 8 पिस्तुलासह 6 जिवंत काडतुसे जप्त - धुळे पोलीस कारवाई

पोलिसांनी संशयितांकडून एकूण 5 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये माध्यमांना दिली.

पोलिसांनी केलेली कारवाई
अटकेतील पिस्तूल, आरोपींसह पोलीस अधिकारी व कर्मचारी
author img

By

Published : Dec 22, 2020, 3:16 PM IST

Updated : Dec 22, 2020, 3:37 PM IST

धुळे- पंजाबमधून पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या संशयितांना सांगवी पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून 8 पिस्तूल, 6 जिवंत काडतूसे व 15 हजार रोख रक्कम असा 5 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पंजाब राज्यातून काही संशयित हे पिस्तूल विक्री करण्याच्या हेतूने महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेलगतच्या भागात आल्याची माहिती सांगवी पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती.
या कारवाईसाठी तात्काळ एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमाराला मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेण्यास सुरवात केली.

पिस्तूल विकण्यासाठी आलेले तीन संशयित जेरबंद
पोलीस पथक महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमाभागातील वरला खंबाळे रोडवर गस्त व तपासणी करीत होते. पथकाला पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास जोयदा गावापासून वरला बाजुकडे काही अंतरावर एक पंजाब राज्यातील कार येताना दिसली. संशय आल्याने पोलिसांनी कार अडविली. या कारमध्ये बसलेल्या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडील काळ्या रंगाच्या बॅगमध्ये 8 देशी पिस्तूल व जिवंत काडतूसे पोलिसांना आढळले. पोलिसांनी संशयितांकडून एकूण 5 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. ही माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये माध्यमांना दिली.

गेल्या वर्षभरात पोलिसांनी जप्त केली २० बेकायदेशीर शस्त्रे

गेल्या वर्षभरात धुळे जिल्हा पोलिसांनी विविध ठिकाणांहून सुमारे 20 बेकायदेशीर शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्रांवर कारवाया केल्या असल्या तरी मुख्य सुत्रधारापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

Last Updated : Dec 22, 2020, 3:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.