ETV Bharat / state

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ : रावल करणार विजयाची हॅटट्रिक ?

author img

By

Published : Sep 20, 2019, 12:59 PM IST

Updated : Sep 20, 2019, 4:15 PM IST

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघावर विद्यमान मंत्री जयकुमार रावल यांचे एकछत्री वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रावल हे विजयाची हॅटट्रिक करणार की आघाडी परिवर्तन घडवणार हे पहावे लागेल...

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ

धुळे - जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात विद्यमान रोजगार हमी, पर्यटन आणि अन्न औषध विभागाचे मंत्री जयकुमार रावल यांचे एकछत्री वर्चस्व राहिले आहे. २००९ पासून ते सातत्याने या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत रावल हे विजयाची हॅटट्रिक करतात की, आघाडी परिवर्तन घडवणार याची चर्चा सध्या रंगू लागली आहे.

हेही वाचा... आष्टी; राष्ट्रवादीचा उमेदवार गुलदस्त्यातच, मुलाच्या उमेदवारीसाठी धस कापणार का आमदार धोंडेंचे तिकीट?

शिंदखेडा हा मतदारसंघ जयकुमार रावल यांच्याच नावाने ओळखला जातो. २००९ पासून जयकुमार रावल हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यासोबत शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ, माजी मंत्री आणि घरकुल घोटाळ्यातील आरोपी हेमंत देशमुख यांच्या नावानेही चर्चेत राहिला आहे. आघाडीच्या काळात हेमंत देशमुख यांची तर युतीच्या काळात जयकुमार रावल यांची राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. मात्र मंत्रिपद मिळूनही या मतदारसंघातील काही प्रश्न सोडविण्यात हे दोघेही नेते अपयशी ठरल्याचे येथील सर्वसामान्य नागरिक बोलत आहेत.

हेही वाचा... 'शेवटच्या श्वासापर्यंत खेड्या-पाड्यातील लोकांची साथ देईन'

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात १६२ गावांचा समावेश होतो. २००९ मध्ये या मतदारसंघाची फेररचना झाली होती. एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या या मतदारसंघाची ओळख जयकुमार रावल यांनी पूर्णपणे पुसली आहे. आपल्या कार्यकाळात जयकुमार रावल यांनी या मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला असून, नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारी, सुलवाडे जामफळ सिंचन योजना देखील कार्यान्वित केली आहे.

हेही वाचा... कर्जत-जामखेड, पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीत बंडखोरीची शक्यता...​​​​​​​

जयकुमार रावल यांना मिळालेल्या मंत्रिपदामुळे धुळे जिल्ह्याच्या आशा अधिक पल्लवित झाल्या होत्या. रावल यांनी देखील रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शिंदखेडा तालुक्यात ५ हजार विहिरींचे काम मार्गी लावल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र असे असले तरीही, या मतदारसंघातील रोजगाराचा प्रश्न, औष्णिक वीज प्रकल्प, सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प हे प्रश्न आजही कायम आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे आणि महत्वाच्या प्रश्नांना हातात घेऊन आघाडी येथे परिवर्तन करणार की, पुन्हा एकदा विजयी होऊन जयकुमार रावल विजयाची हॅटट्रिक मारणार हे पाहणे, मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा... नालासोपाऱ्यात भाजपची बाईक रॅली की शक्ती प्रदर्शन ?​​​​​​​

२०१९ च्या निवडणुकीसाठी इच्छुक कोण ?

शिंदखेडा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून श्यामकांत सनेर, जुही देशमुख, ज्ञानेश्वर भामरे हे उमेदवार इच्छुक असल्याचे बोलले जात आहे तर राष्ट्रवादीकडून संदीप बेडसे, शिवसेनेकडून हेमंत साळुंखे, शानाभाऊ सोनवणे हे इच्छुक उमेदवार आहेत. भाजपकडून मात्र जयकुमार रावल यांचे नाव निश्चित मानले जात आहे.

हेही वाचा... शेतकऱ्यांचा स्वाभिमानी 'वाघ' आता विधानसभेच्या रणांगणात?​​​​​​​

२०१४ च्या निवडणुकीत मिळालेली मते

  1. भाजप - जयकुमार रावल - ९२ हजार ६६७
  2. राष्ट्रवादी - संदीप बेडसे - ५० हजार ६३६
  3. काँग्रेस - श्यामकांत सनेर - ४८ हजार २५
  4. शिवसेना - राजेंद्र गिरासे - २ हजार २६३

Intro:धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदार संघात विद्यमान रोजगार हमी, पर्यटन आणि अन्न औषध विभागाचे मंत्री जयकुमार रावल यांचा एकछत्री अंमल राहिला आहे. २००९ पासून ते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असून पिण्याच्या पाण्याच्या समस्या तसेच शिंदखेडा विधानसभा मतदार संघातील अनेक प्रश्न त्यांनी आजवर मार्गी लावले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार रावल हे हॅटट्रिक करतात कि आघाडी परिवर्तन घडवतंय हे बघणं महत्वाचं असणार आहे.
Body:धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा हा विधानसभा मतदार संघ प्रामुख्याने ओळखला जातो तो जयकुमार रावल यांच्या नावाने. २००९ पासून जयकुमार रावल हे या मतदार संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. यासोबत शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो तो माजी मंत्री आणि घरकुल घोटाळ्यातील आरोपी हेमंत देशमुख यांच्या नावाने. आघाडीच्या काळात हेमंत देशमुख यांची तर युतीच्या काळात जयकुमार रावल यांची राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. मात्र मंत्रिपद मिळूनही या मतदारसंघातील काही प्रश्न सोडविण्यात हे दोघंही अपयशी ठरले आहेत. शिंदखेडा विधानसभा मतदार संघात १६२ गावांचा समावेश होतो. २००९ मध्ये या मतदारसंघाची फेररचना झाली, जयकुमार रावल यांना मिळालेल्या मंत्रिपदामुळे धुळे जिल्ह्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या या मतदारसंघाची ओळख जयकुमार रावल यांनी पुसली आहे. आपल्या कार्यकाळात जयकुमार रावल यांनी या मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला असून, जिव्हाळ्याचा विषय असणारी सुलवाडे जामफळ सिंचन योजना देखील कार्यान्वित केली आहे. यासोबत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शिंदखेडा तालुक्यात ५ हजार विहिरी खोदण्यात आल्या आहेत. मात्र असं असलं तरी या मतदार संघातील रोजगाराचा प्रश्न, औष्णिक वीज प्रकल्प, सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प हे प्रश्न आजही कायम आहेत. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा विजयी होऊन जयकुमार रावल हॅटट्रिक करतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

२०१९ च्या निवडणुकीत कोण आहेत इच्छुक ?

काँग्रेसकडून श्यामकांत सनेर, जुही देशमुख, ज्ञानेश्वर भामरे, राष्ट्रवादीकडून संदीप बेडसे, शिवसेनेकडून हेमंत साळुंखे, शानाभाऊ सोनवणे हे इच्छुक असून भाजपकडून जयकुमार रावल यांचं नाव निश्चित झालं आहे.

२०१४ च्या निवडणुकीत मिळालेली मते

१) भाजप - जयकुमार रावल - ९२ हजार ६६७

२) राष्ट्रवादी - संदीप बेडसे - ५० हजार ६३६

३) काँग्रेस - श्यामकांत सनेर - ४८ हजार २५

४) शिवसेना - राजेंद्र गिरासे - २ हजार २६३

Conclusion:
Last Updated : Sep 20, 2019, 4:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.