ETV Bharat / state

शेतीच्या बांधावरुन दोन गटात राडा; कुऱ्हाडीचे घाव घातल्याने एक ठार, दोनजण जखमी

धमनार येथे शेतीच्या बांधावरुन दोन गटात राडा झाला. यावेळी कुऱ्हाडीने घाव घातल्याने एक जण ठार झाल्याने खळबळ उडाली. सुभाष भूषण वाघ असे या भांडणात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

dhule
भांडणात ठार झालेले सुभाष भूषण वाघ
author img

By

Published : Jun 20, 2020, 4:33 PM IST

धुळे - साक्री तालुक्यातील धमनार येथे शेतीच्या बांधावरुन दोन गटात राडा झाला. यावेळी कुऱ्हाडीने घाव घातल्याने एक जण ठार झाल्याने खळबळ उडाली. सुभाष भूषण वाघ असे या भांडणात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर खिवराज धर्मा वाघ, सागर खिवराज वाघ हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर साक्री ग्रामीण रुग्णालयात डॉ. श्रीकांत पाटील यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे.

धमनार गावातील भिम शक्ति नगर येथे आरोपींनी मागील भांडणाची कुरापत काढली. घराजवळ येवून दगडांचा मारा करत सुभाष भिवसन वाघ यांच्यावर कुऱ्हाडीने वार करत जखमी केले. तर खिवराज धर्मा वाघ, सागर खिवराज वाघ हे दोन्ही गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती साक्री पोलीसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक अशोक अहिरे, सहायक पोलीस निरीक्षक भानुदास नऱ्हे, गोपनीय शाखेचे अविनाश पाटोळे, चेतन गोसावी, विशाल परदेशी आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना खासगी गाडीत टाकून साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याबाबत साक्री पोलीस ठाण्यात अशोक भिवसन वाघ यांनी तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास दुमने हे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.