धुळे - महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ आणि खान्देश कुलस्वामिनी अशी धुळ्यातील एकवीरा देवीची ख्याती आहे. एकवीरा देवीला मकर संक्रांतीनिमित्त हलव्याच्या दागिन्यांचा साजशृंगार करण्यात आला आहे. देवीचे हे रूप पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे.
मकर संक्रांतीनिमित्त एकवीरा देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात देवीचा महाअभिषेक आणि कुंकुमार्चन(इच्छित देवाला कुंकू वाहत नामजप करणे) पार पडले.
हेही वाचा - मकर संक्रांतीचा सण १४ जानेवारीलाच का येतो?
धुळे शहरातील पांझरा नदीच्या किना-यावर देवूपर भागात हे देवस्थान आहे. एकवीरा देवीची स्वयंभू अष्टभूजा मूर्ती येथे आहे. खान्देशामध्ये या देवीची आराध्य दैवत म्हणून पुजा केली जाते.