ETV Bharat / state

बाप्पाच्या आगमनाची आतुरता; गणेश मूर्तींनी सजली धुळे बाजारपेठ

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्याची ओढ अनेकांना लागली आहे. त्यासाठीच धुळे बाजारपेठ गणेश मूर्तींनी सजलेली पाहायला मिळते.

author img

By

Published : Aug 28, 2019, 9:13 AM IST

Updated : Aug 28, 2019, 3:26 PM IST

बाप्पाच्या आगमनाची आतुरता

धुळे - गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागलेली आहे. त्यासाठी गणेश मूर्ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच उत्तम पाऊस झाल्याने जिल्ह्यात सुख-समृद्धीचे वातावरण आहे. त्यामुळे गणेश मूर्तींना देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

बाप्पाच्या आगमनाची आतुरता; गणेश मूर्तींनी सजली धुळे बाजारपेठ

हे वाचलं का? - पाचवीत बघितलेले स्वप्न झाले पूर्ण; आता गणेश मूर्तींचा उभारणार कारखाना

शहरातील खरे बंधू यांचा गणेश मूर्ती तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास बघून त्यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्यावर भर दिला आहे. तसेच त्यांच्याकडे कागद्याच्या लगद्यापासून तयार केलेल्या गणेश मूर्ती त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.

हे वाचलं का? - नाशकात गणपती बाप्पा देणार वाहतूक नियमांचे धडे; मूर्तीकार योगेश टिळेंची संकल्पना

गणेशोत्सवाच्या ६ महिन्यापूर्वी गणेश मूर्ती तयार करायला सुरुवात केली जाते. विशेष म्हणजे या कामासाठी घरचे सगळे सदस्य मोठ्या उत्साहाने कामाला लागतात. महिला सद्स्य गणरायाच्या मूर्ती आकर्षक रंगांनी रंगवतात. तसेच मूर्तीला जिवंतपणा आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे मूर्तीचे डोळे काढण्याचे काम महिला करतात.

Intro:विघ्नहर्ता गणरायाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून या उत्सवासाठी लागणाऱ्या पार्थिव गणेश मुर्ती बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. धुळे शहरातील खरे बंधू यांच्याकडे आकर्षक गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध असून यंदा जिल्ह्यात उत्तम पाऊस झाला असल्याने नागरिकांकडून मूर्तींना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. पाहूया यावर ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट....Body:अवघ्या महाराष्ट्राच आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक गणेश मूर्ती बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. धुळे शहरातील खरे बंधू यांच्याकडे आकर्षक गणेश मूर्ती तयार झाल्या आहेत. खरे बंधू यांचा गणेश मूर्ती तयार करण्याचा पारंपारिक व्यवसाय असून इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार करण्यावर त्यांचा भर असतो. गणेशोत्सवाच्या सहा महिन्या आधी गणेश मूर्ती तयार करायला सुरुवात केली जाते. खरे बंधू यांच्याकडच्या गणेशमूर्तींना संपूर्ण. जिल्ह्यातून आणि अन्य जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. विशेष म्हणजे या कामासाठी घरचे सगळे सदस्य मोठ्या उत्साहाने कामाला लागतात. महिला सदस्या गणरायाच्या मूर्ती आकर्षक रंगांनी रंगवतात. तसेच मूर्तीला जिवंतपणा आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे तिचे डोळे काढण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम महिला सदस्य करतात. यंदा संपूर्ण जिल्ह्यात उत्तम पाऊस झाला असून मूर्त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचं सांगण्यात आलं आहे.Conclusion:
Last Updated : Aug 28, 2019, 3:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.