धुळे - शहरासह आजूबाजूच्या परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अवेळी आलेल्या या पावसामुळे रब्बी हंगामाची पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हेही वाचा - नंदुरबारमधील या गावातील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार; केवळ एका मतदाराने बजावला हक्क
पुढील दोन दिवस पावसाची संततधार सुरू राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा तयार झाला आहे. मंगळवारी अक्कलपाडा धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा पांझरा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.