धुळे - जिल्ह्यात मंगळवारी 52 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण रुग्ण संख्या 1 हजार 675वर पोहचली आहे. त्यातील 1 हजार 18 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 79 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
शहरातील 41, शिरपूर तालुक्यातील 09, धुळे तालुक्यातील 02 आणि अशा एकूण 52 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. तर मंगळवारी दिवसभरात धुळे मोहाडी येथील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 59 रुग्णांनी कोरोनावर मात करत डिस्चार्ज मिळवले आहे. धुळे शहरातील 24 शिरपूर तालुक्यातील 22, धुळे तालुक्यातील 6, शिंदखेडा तालुक्यातील 4, साक्री तालुक्यातील 3 अशा 59 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
सविस्तर आकडेवारी - धुळे शहरात 832 रुग्ण आढळले, तर 550 जण कोरोनामुक्त झाले. तसेच 39 जणांचा मृत्यू झाला. धुळे ग्रामीणमध्ये 843 कोरोना रुग्ण आढळले. तर 468 जण बरे झाले आहेत. तसेच 40 जणांचा मृत्यू झाला आहे. धुळे तालुक्यात 87 कोरोना रुग्ण आढळले. तर 43 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 6 जणांचा बळी गेला आहे.
शिरपूर शहर/ग्रामीणमध्ये 575 कोरोना रुग्ण आढळले असून 335 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 22 जणांचा बळी गेला आहे. शिंदखेडा तालुक्यामध्ये 108 रुग्म आढळले असून 41 जण कोरोनामधून बरे झाले असून 5 जणांचा बळी गेला आहे. साक्री तालुका 73 कोरोना रुग्ण आढळले असून 49 जण बरे झाले आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर जिल्ह्याबाहेरील रुग्ण 61 असून त्यातील 37 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 7 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.