ETV Bharat / state

अज्ञात इसमाचा धुळ्यात दगडाने ठेचून खून

काही अज्ञातांनी सदर इसमाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

murder
murder
author img

By

Published : Dec 18, 2020, 1:48 PM IST

धुळे - शहरातील चाळीसगाव रोड भागात असलेल्या एका शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली मात्र मृतदेहाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.

दगडाने ठेचले

धुळे शहरातील चाळीसगाव रोड भागात असलेल्या अन्वर नाल्याकडे जाणाऱ्या रस्त्यात असलेल्या एका शिवारात एका अनोळखी इसमाचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला. याबाबतची माहिती नागरिकांनी पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली. काही अज्ञातांनी सदर इसमाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

कारण अस्पष्ट

हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच मृतदेहांची ओळख पटू शकली नाही. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी फोरेन्सिक लॅबसह अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये झाली वाढ

धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून याबाबत पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत आरोपींचा शोध घेण्याची मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.