धुळे - महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता कर भरणे अधिक सुलभ व्हावे यासाठी धुळे महापालिकेने 'धुळे ई-कनेक्ट' या नावाने अॅप विकसित केले आहे. आयुक्त अजीज शेख यांच्या उपस्थितीत या अॅपचा शुभारंभ करण्यात आला.
हेही वाचा - धुळ्यात ऊस तोडणीवेळी आढळले बिबट्याचे 4 बछडे, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
धुळे महानगरपालिकेत ई-गव्हर्नन्सअंतर्गत विविध संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेल्या आहेत. धुळे महानगर पालिकेतील कार्यप्रणालीत पारदर्शकता आणि गतीमानता यावी या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून नागरिकांना महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास सुलभ व्हावे, यासाठी मालमत्ताकर विभागासाठी धुळे ई-कनेक्ट हे नवीन अॅप असेंटक कंपनीच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे.
हेही वाचा - अनिल गोटे यांचा राष्ट्रवादीत होणार अधिकृत प्रवेश
केंद्र आणि राज्य शासनाच्या मोबाईल गव्हर्नन्स धोरणांतर्गत हे अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपद्वारे नागरिकांना मालमत्ता कराची संपूर्ण माहिती बघता येणार आहे. तसेच याद्वारे आपल्या मालमत्ता कराचा भरणा देखील नागरिकांना घरबसल्या करता येणार आहे. मालमत्ता कर भरल्यानंतर त्याची पावती लगेच डाऊनलोड करता येणार आहे. यामुळे या कार्यप्रणालीत पारदर्शकता येणार आहे.
हेही वाचा - धुळे शहरात पावसाने लावली हजेरी, नागरिकांची तारांबळ
नागरिकांना 'गुगल प्ले स्टोअर'च्या माध्यमातून अँड्रॉइड मोबाईलद्वारे हे अॅप डाउनलोड करता येईल. नागरिकांनी अॅपच्या माध्यमातून केलेला भरणा संपूर्णतः सुरक्षित असणार आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या एका क्लिकवर आपल्या संपूर्ण मालमत्तेच्या कराची माहिती उपलब्ध होणार आहे. धुळे महानगरपालिकेने विकसित केलेल्या या अॅपचा आयुक्त अजीज शेख यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.