ETV Bharat / state

MNS Agitation : धुळ्यात मनसे कार्यकर्त्यांना अटक; भोंगा जप्त

पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत कारवाई केली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडून दडपशाही होत असून मनसेचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला.

author img

By

Published : May 4, 2022, 12:11 PM IST

धुळ्यात मनसे कार्यकर्त्यांना अटक
धुळ्यात मनसे कार्यकर्त्यांना अटक

धुळे - शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांच्या आदेशानुसार भोंग्यांविरोधात विविध भागात आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी महाविकासआघाडीचा निषेध करीत शहराच्या विविध भागात निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी भोंगे हातात घेतले होते. दरम्यान पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत कारवाई केली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडून दडपशाही होत असून मनसेचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला.

धुळ्यात मनसे कार्यकर्त्यांना अटक

भोंगा जप्त - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत मशिदीसमोर दुप्पट आवाजाने भोंगा लावून हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख व त्यांचे सहकारी आज सकाळी शिवतीर्थ येथे जमले. त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करत शहर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले. यावेळी मनसे जिल्हा सरचिटणीस संदीप जडी, मनसे धुळे तालुका अध्यक्ष संतोष मिस्त्री, मनसे महिला सेना जिल्हाध्यक्ष संध्या पाटील, उपजिल्हाध्यक्ष स्वाती जाधव, शहर उपाध्यक्ष प्रशांत तनेजा, राजेश दुसाने, विभाग अध्यक्ष योगेश वाणी, हरीश जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी त्यांच्या सोबत हनुमान चालीसा वाजवण्यासाठी सोबत घेतलेला भोंगा देखील जप्त करण्यात आला आहे. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी जय श्रीराम, जय हनुमान अशा जोरदार घोषणा दिल्या व आघाडी सरकारचा जाहीर निषेध करत सदर अटक ही हिंदूंचा आवाज दाबला जावा यासाठी असली तरी आम्ही हे सहन करणार नाही, अशा घोषणा देण्यात येत होत्या.

हेही वाचा - Raj Thackeray : राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ ट्विट, उद्धव ठाकरेंना करून दिली आठवण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.