ETV Bharat / state

अपसंपदा प्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची आमदारांची मागणी, धुळे महापालिकेत खळबळ - धुळे महापालिकेतील अधिकाऱ्यांची चौकशी

धुळे शहरातील रस्त्यांच्या प्रश्नी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणाला आमदारदेखील कंटाळले. तिथं सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे काय, असे उद्विग्न विधान धुळे शहराचे एमआयएमचे आमदार फारुख शहा यांनी उपस्थित करत धुळे महानगर पालिकेतील 4 अधिकाऱ्यांची अपसंपदा प्रकरणी चौकशी करावी, अशा आशयाचे पत्र आमदारांनी मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांना दिले. यामुळे धुळे महापालिकेत खळबळ माजली आहे.

आमदारांच्या मागणीने धुळे  महापालिकेत खळबळ

author img

By

Published : Mar 6, 2020, 3:03 AM IST

धुळे - धुळे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त, उपायुक्तासह 4 अधिकाऱ्यांची अपसंपदा प्रकरणी चौकशी करण्याची मागणी एमआयएमचे आमदार फारुख शहा यांनी मुख्यमंत्री, आणि विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. आमदार शहा यांच्या या मागणीमुळे धुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

आमदार फारुख शहा

धुळे शहरातील रस्त्यांच्या प्रश्नी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणाला आमदारदेखील कंटाळले. तिथं सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे काय, असे उद्विग्न विधान धुळे शहराचे एमआयएमचे आमदार फारुख शहा यांनी उपस्थित करत धुळे महानगरपालिकेतील 4 अधिकाऱ्यांची अपसंपदा प्रकरणी चौकशी करावी, अशा आशयाचे पत्र आमदारांनी मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांना दिले. यामुळे धुळे महापालिकेत खळबळ माजली आहे. महापालिकेत एकाच जागेवर वर्षानुवर्षे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची देखील चौकशीची मागणी आमदार फारुख शहा यांनी केली आहे. यामध्ये, धुळे महानगर पालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, आरोग्य अधिकारी महेश मोरे, अभियंता कैलास शिंदे या चार अधिकाऱ्यांची अपसंपदा प्रकरणी चौकशी करण्याची मागणी आमदारांनी केली आहे.

हेही वाचा - धुळ्यात खवय्यांनी लुटला चिकन फेस्टिवलचा आस्वाद

दरम्यान, प्रत्येक शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्याने दरवर्षी आपल्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष असलेल्या प्रॉपर्टी संदर्भात शासनाला माहिती देणे बंधनकारक आहे. असे असताना आयुक्तांनी यावर कारवाई केली आहे का, याबाबतची माहिती महानगर पालिकेच्या वतीनं देण्यात आलेली नाही.

हेही वाचा - धुळे: दहावीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात; जिल्ह्यात 31 हजार 837 विद्यार्थी देणार परीक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.