ETV Bharat / state

मराठा क्रांती मूक मोर्चाचा हिना गावितांना विरोध - उमेदवारी

मराठा समाज बांधवांवर गुन्हा दाखल केला म्हणून हिना गावित यांच्या लोकसभा उमेदवारीला धुळ्यात विरोध करण्यात आला.

मराठा क्रांती मूक मोर्चाचा हिना गावितांना विरोध
author img

By

Published : Mar 18, 2019, 5:58 PM IST

धुळे - खासदार हिना गावित यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास मराठा क्रांती मूक मोर्चा त्यांच्या विरोधात प्रचार करेल, असे निवेदन धुळे जिल्हा मराठा क्रांती मूक मोर्चाच्यावतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना देण्यात आले आहे. मराठा समाज बांधवांवर गुन्हा दाखल केला म्हणून त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला आहे.

मागील वर्षी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मूक मोर्चाच्यावतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु होते. यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आलेल्या खासदार हिना गावित यांच्या वाहनाची काही उत्साही कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर मराठा क्रांती मूक मोर्चाच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन हिना गावित यांची माफी मागण्यात आली. मात्र, त्यानंतर देखील त्यांनी मराठा समाजातील तरुणांवर आणि कार्यकर्त्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला.

हिना गावित यांनी अशाप्रकारे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून मराठा आणि आदिवासी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना नंदुरबार लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात येऊ नये. जर त्यांना उमेदवारी दिल्यास मराठा क्रांती मूक मोर्चा त्यांच्याविरोधात प्रचार करेल, असे पत्र धुळे जिल्हा मराठा क्रांती मूक मोर्चाच्यावतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना देण्यात आले आहे. मराठा क्रांती मूक मोर्चाच्या या पत्राची दखल घेऊन हिना गावित यांच्या उमेदवारीबाबत कोणता निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Intro:मराठा आणि आदिवासी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या हिना गावितांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास मराठा क्रांती मूक मोर्चा त्यांच्या विरोधात प्रचार करेल असं निवेदन धुळे जिल्हा मराठा क्रांती मूक मोर्च्याच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना देण्यात आलं आहे. मराठा समाज बांधवांवर गुन्हा दाखल केला म्हणून मराठा क्रांती मूक मोर्च्याने हिना गावित यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. Body:गेल्या वर्षी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मूक मोर्च्याच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु होते. यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आलेल्या खा हिना गावित यांच्या वाहनाची काही उत्साही कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर मराठा क्रांती मूक मोर्च्याच्या वतीने पत्रकारपरिषद घेऊन खा हिना गावित यांची माफी मागण्यात आली होती. मात्र त्यानंतर देखील त्यांनी मराठा समाजातील तरुणांवर आणि कार्यकर्त्यांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता, खा हिना गावित यांनी अश्या प्रकारे ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून मराठा आणि आदिवासी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर हिना गावित यांना नंदुरबार लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात येऊ नये, हिना गावित यांना उमेदवारी दिल्यास मराठा क्रांती मूक मोर्चा त्यांच्या विरोधात प्रचार करेल असे पत्र धुळे जिल्हा मराठा क्रांती मूक मोर्च्याच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना देण्यात आले आहे. मराठा क्रांती मूक मोर्च्याच्या या पत्राची दखल घेऊन हिना गावित यांच्या उमेदवारीबाबत कोणता निर्णय होतो हे याकडे लक्ष लागून आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.