ETV Bharat / state

धुळ्यातील शिरपूर मतदारसंघात भाजप परिवर्तन घडवेल का? - शिरपूरचा जलसंवर्धन पॅटर्न

२००९ पासून या मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला आहे. शिरपूरचा जलसंवर्धन पॅटर्न हा संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. काँग्रेसचे आमदार काशीराम पावरा हे २००९ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

धुळ्यातील शिरपूर मतदारसंघात भाजप परिवर्तन घडवेल का
author img

By

Published : Sep 18, 2019, 12:10 PM IST

धुळे - जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २००९ पासून या मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला आहे. शिरपूरचा जलसंवर्धन पॅटर्न हा संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. काँग्रेसचे आमदार काशीराम पावरा हे २००९ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भाजपकडून डॉ. जितेंद्र ठाकूर हे निवडणूक लढविण्यास इच्छुक असून या निवडणुकीत काँग्रेस हॅट्ट्रीक करते कि, भाजप परिवर्तन घडवते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

हेही वाचा - 'या' आरोपाखाली गृहमंत्री अमित शाह गेले होते तुरुंगात, पवारांनी जाहीर सभेत लगावला होता टोला

धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदारसंघ हा संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते अमरीश पटेल यांनी या तालुक्याला वेगळी ओळख प्राप्त करून दिली आहे. यासोबत जलसंवर्धनाचा शिरपूर पॅटर्न देखील सर्वश्रुत आहे. यासोबत गानकोकिळा लता मंगेशकर यांचे आजोळदेखील शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील असून सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांचे मूळ गाव म्हणून देखील शिरपूरची ओळख आहे. २००९ पासून शिरपूर विधानसभा मतदारसंघ हा राखीव असला तरी या मतदारसंघात काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. अमरीश पटेल यांचे विश्वासू आमदार काशीराम पावरा हे २००९ पासून या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत.

हेही वाचा - माझा मुख्यमंत्र्यांवर विश्वास, लवकरच भाजपवासी होणार - नारायण राणे

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देखील काशीराम पावरा हे रिंगणात असतील हे निश्चित झाले आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपचे जितेंद्र ठाकूर हे गेल्या ९ वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून त्यांनी जनतेत आपली वेगळी ओळखदेखील प्राप्त केली आहे. डॉ जितेंद्र ठाकूर यांनी ३ लाखाहून अधिक लोकांचा अपघाती विमा उतरविला असून १० ते १५ जणांना २५ हजारांची वैद्यकीय मदत देखील केली आहे. तरुण नेतृत्व आणि उच्चशिक्षित उमेदवार म्हणून देखील त्यांची ओळख आहे. डॉ जितेंद्र ठाकूर हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिरपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला ७६ हजार ६८२ मते तर भाजपला १ लाख १७ हजार ३८८ मते मिळाली होती. यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील या मतदारसंघात भाजप परिवर्तन घडवेल, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. यामुळे या निवडणुकीत काँग्रेस हॅट्ट्रिक करते की, भाजप परिवर्तन घडवत हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

आमदार काशीराम पावरा यांच्या कमकुवत बाजू

आमदार काशीराम पावरा यांचे शिरपूर तालुक्यातील सुळे हे मूळ गाव असून या गावात अनेक समस्या आजही कायम आहेत. सलग २ वेळा विजयी होऊन देखील काशीराम पावरा यांनी आपल्या गावाचा विकास केलेला नाही, असे विरोधकांचे म्हणणे आहे, दुसरीकडे शिरपूर तालुक्यातील हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह ज्या साखर कारखान्यावर सुरु होता, तो दहिवद येथील साखर कारखाना गेल्या १० वर्षांपासून बंद आहे, यासोबत सूतगिरणीची देखील परिस्थिती वाईट असून ती देखील बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

हेही वाचा - धारावी मतदारसंघ काँग्रेसच्या वर्षा गायकवाड राखणार का?

आमदार काशीराम पावरा यांच्या जमेच्या बाजू

शिरपूर तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर चालतात, या अवैध धंद्यांमुळे शिरपूर तालुका बदमान झाला आहे. अवैध धंद्याचे माहेघर ही ओळख पुसण्यासाठी आमदार काशीराम पावरा यांनी अमरीश पटेल यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधून घेतले होत. यासोबत आदिवासींच्या प्रश्नांसंदर्भात काशीराम पावरा यांनी काढलेला मोर्चा देखील सर्वश्रुत आहे.

विधानसभा निवडणुकीत कोण आहेत इच्छुक ?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून डॉ. जितेंद्र ठाकूर हे इच्छुक असून वंचित बहुजन आघाडी देखील आपले नशीब आजमवणार आहे, मात्र उमेदवार कोण असेल हे अजून निश्चित झालेले नाही.

२०१४ साली मिळालेली मते ?

१) काँग्रेस - काशीराम पावरा - ९८ हजार ११४

२) भाजप - डॉ जितेंद्र ठाकूर - ७२ हजार ९१३

३) राष्ट्रवादी - जयवंत पाडवी - ११ हजार ४०९

४) कम्युनिस्ट - गुलाब मालचे - ५ हजार ५४७

५) शिवसेना - रणजित पवार - ३ हजार ९४२

शिरपूर विधानसभा मतदारसंघातील मतदार संख्या

पुरुष मतदार - १ लाख ५३ हजार २८२

स्त्री मतदार - १ लाख ५९ हजार २९५

एकूण मतदार - ३ लाख १२ हजार ५७७

Intro:धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २००९ पासून या मतदार संघात काँग्रेसने विजय मिळवला आहे. शिरपूरचा जलसंवर्धन पॅटर्न हा संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. काँग्रेसचे आमदार काशीराम पावरा हे २००९ पासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भाजपकडून डॉ जितेंद्र ठाकूर हे निवडणूक लढविण्यास इच्छुक असून या निवडणुकीत काँग्रेस हॅटट्रिक करत कि भाजप परिवर्तन घडवत हे बघणं महत्वाचं असणार आहे. Body:
धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदार संघ हा संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते अमरीश पटेल यांनी या तालुक्याला वेगळी ओळख प्राप्त करून दिली आहे. यासोबत जलसंवर्धनाचा शिरपूर पॅटर्न देखील सर्वश्रुत आहे. यासोबत गानकोकिळा लता मंगेशकर यांचं आजोळ देखील शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील असून सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांचं मूळ गाव म्हणून देखील शिरपूरची ओळख आहे. २००९ पासून शिरपूर विधानसभा मतदार संघ हा राखीव असला तरी या मतदारसंघात काँग्रेसने आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. अमरीश पटेल यांचे विश्वासू आमदार काशीराम पावरा हे २००९ पासून या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देखील काशीराम पावरा हे रिंगणात असतील हे निश्चित झालं आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपचे जितेंद्र ठाकूर हे गेल्या ९ वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून त्यांनी जनतेत आपली वेगळी ओळख देखील प्राप्त केली आहे. डॉ जितेंद्र ठाकूर यांनी ३ लाखाहून अधिक लोकांचा अपघाती विमा उतरविला असून १० ते १५ जणांना २५ हजारांची वैद्यकीय मदत देखील केली आहे. तरुण नेतृत्व आणि उच्चशिक्षित उमेदवार म्हणून देखील त्यांची ओळख आहे. डॉ जितेंद्र ठाकूर हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत,नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिरपूर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसला ७६ हजार ६८२ मते तर भाजपला १ लाख १७ हजार ३८८ मते मिळाली होती. यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील या मतदार संघात भाजप परिवर्तन घडवेल असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. यामुळे या निवडणुकीत काँग्रेस हॅटट्रिक करत कि भाजप परिवर्तन घडवत हे बघणं महत्वाचं असणार आहे.

आमदार काशीराम पावरा यांच्या कमकुवत बाजू

आमदार काशीराम पावरा यांचं शिरपूर तालुक्यातील सुळे हे मूळ गाव असून या गावात अनेक समस्या आजही कायम आहेत. सलग २ वेळा विजयी होऊन देखील या काशीराम पावरा यांनी आपल्या गावाचा विकास केलेला नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे, दुसरीकडे शिरपूर तालुक्यातील हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह ज्या साखर कारखान्यावर सुरु होता तो दहिवद येथील साखर कारखाना गेल्या १० वर्षांपासून बंद आहे, यासोबत सूतगिरणीची देखील परिस्थिती वाईट असून ती देखील बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

आमदार काशीराम पावरा यांच्या जमेच्या बाजू

शिरपूर तालुक्यात अवैध धंदे हे मोठ्या प्रमाणावर चालतात, या अवैध धंद्यांमुळे शिरपूर तालुका बदमान झाला आहे. अवैध धंद्याचं माहेघर हि ओळख पुसण्यासाठी आमदार काशीराम पावरा यांनी अमरीश पटेल यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून शासनाचं लक्ष वेधून घेतलं होत. यासोबत आदिवासींच्या प्रश्नसंदर्भात काशीराम पावरा यांनी काढलेला मोर्चा देखील सर्वश्रुत आहे.

विधानसभा निवडणुकीत कोण आहेत इच्छुक ?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून डॉ जितेंद्र ठाकूर हे इच्छुक असून वंचित बहुजन आघाडी देखील आपलं नशीब आजमवणार आहे, मात्र उमेदवार कोण असेल हे अजून निश्चित झालेलं नाही.

२०१४ साली मिळालेली मते ?

१) काँग्रेस - काशीराम पावरा - ९८ हजार ११४

२) भाजप - डॉ जितेंद्र ठाकूर - ७२ हजार ९१३

३) राष्ट्रवादी - जयवंत पाडवी - ११ हजार ४०९

४) कम्युनिस्ट - गुलाब मालचे - ५ हजार ५४७

५) शिवसेना - रणजित पवार - ३ हजार ९४२

शिरपूर विधानसभा मतदार संघातील मतदार संख्या

पुरुष मतदार - १ लाख ५३ हजार २८२

स्त्री मतदार - १ लाख ५९ हजार २९५

एकूण मतदार - ३ लाख १२ हजार ५७७

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.