ETV Bharat / state

धुळे: जमनागिरी महादेव मंदिरात भाविकांची गर्दी

धुळे जिल्हा अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. धुळे शहर आणि जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक मंदिरे असून शहरातील जमनागिरी महादेव मंदिर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. श्रावण महिना सुरु असल्याने भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे.

महादेव मंदिर
author img

By

Published : Aug 6, 2019, 8:53 AM IST

धुळे - हिंदू धर्मियांसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यातील सोमवारी महादेवाची विधिवत पूजा केली जाते. धुळे शहर आणि जिल्ह्यात महादेवाची अनेक मंदिरे आहेत. यांपैकी एक जमनागिरी महादेव मंदिरात सध्या भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

धुळे जिल्हा अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. धुळे शहर आणि जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक मंदिरे असून शहरातील जमनागिरी महादेव मंदिर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. २०० वर्षांपूर्वी, १८६७ ला सद्गुरू जमनागिरी महाराजांना ब्रिटिशांनी दान केलेल्या जमिनीवर हे महादेव मंदिर उभारण्यात आले होते. छोटेसे पण अतिशय सुबक असलेले हे महादेव मंदिर आजही सुस्थितीत आहे. मंदिराच्या समोरच जमनागिरी महाराजांची समाधी असून श्रावण महिन्यात याठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. महाराष्ट्रासह परराज्यातून देखील भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात. अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली पायविहीर आजही याठिकाणी पाहायला मिळते. उज्जैनहून त्रंबकेश्वराला जाणाऱ्या भाविकांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून अहिल्याबाई होळकरांनी याठिकाणी पायविहीर बांधली होती.
अनेक भाविक याठिकाणी नवस करतात, तसेच नवस पूर्ण झाल्यावर डाळ बाटीचा नैवेद्य महादेवाला दाखवतात. या मंदिराचा कारभार जमनागिरी महाराजांची ८वी पिढी सांभाळत आहे. मंदिराच्या आवारात गोरक्ष चिंचेचे मोठे झाड असून याठिकाणी सापांचा मुक्त वावर असतो. नागपंचमीला याठिकाणी नागाची पूजा करण्यासाठी अनेक भाविक येतात. अतिशय शांत आणि निसर्गरम्य असा हा परिसर असून प्रत्येकाने एकदा तरी याठिकाणी भेट द्यावी असे हे ठिकाण आहे.

Intro:हिंदू धर्मियांच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्यात पावसासोबत भक्तीचा महिमा गायला जातो. श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी महादेवाची विधिवत पूजा केली जाते. धुळे शहर आणि जिल्ह्यात अनेक प्राचीन महादेव मंदिरे आहेत. आजच्या पहिल्या श्रावण सोमवारी आपण पाहणार आहोत २०० वर्ष जुन्या असलेल्या जमनागिरी महादेव मंदिराचा इतिहास.
Body:खान्देशातील एक महत्वाचा जिल्हा म्हणून धुळे जिल्ह्याची ओळख आहे. अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक गोष्टींसाठी धुळे जिल्हा प्रसिद्ध आहे. धुळे शहर आणि जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत. धुळे शहरातील जमनागिरी महादेव मंदिर हे संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. २०० वर्षांपूर्वी अर्थात १८६७ साली सद्गुरू जमनागिरी महाराजांना ब्रिटिशांनी दान केलेल्या जमिनीवर हे महादेव मंदिर उभारण्यात आले आहे. अतिशय सुबक परंतु छोटेसे असलेले हे महादेव मंदिर आजही सुस्थितीत आहे. मंदिराच्या समोरच जमनागिरी महाराजांची समाधी असून श्रावण महिन्यात याठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते, महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात. अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली पायविहीर आजही याठिकाणी पाहायला मिळते. उज्जैनहून त्रंबकेश्वराला जाणाऱ्या भाविकांची पाण्याची सोय व्हावी म्हणून अहिल्याबाई होळकरांनी याठिकाणी पायविहीर बांधली होती. अपत्य प्राप्तीसाठी अनेक भाविक याठिकाणी नवस करतात आणि नवस पूर्ण झाल्यावर डाळ बाटीचा नैवेद्य दाखवतात. आज मंदिराचा कारभार जमनागिरी महाराजांची ८ वी पिढी बघत आहे. मंदिराच्या आवारात गोरक्ष चिंचेचे मोठे झाड असून याठिकाणी सापांचा मुक्त वावर असतो. नागपंचमीला याठिकाणी भाविक नागाची पूजा करण्यासाठी येत असतात. अतिशय शांत आणि निसर्गरम्य असा हा परिसर असून प्रत्येकाने एकदा तरी याठिकाणी येऊन दर्शन घ्यावं असं हे ठिकाण आहे. Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.