ETV Bharat / state

विकासकामांच्या मुद्द्यावरून महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक - महापौर चंद्रकांत सोनार

धुळे महापालिकेच्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात शनिवारी महासभेचे आयोजन करण्यात आले होते.

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक
author img

By

Published : Sep 7, 2019, 8:44 PM IST

Updated : Sep 8, 2019, 12:02 AM IST

धुळे - महापालिकेत आयोजित करण्यात आलेल्या महासभेत विकास कामांच्या मुद्द्यावरून शनिवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा देखील प्रयत्न झाला. यावेळी संतप्त झालेल्या महापौरांकडून शिवराळ भाषेचा वापर झाला.

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक

हेही वाचा - विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांची शिकवण देणे गरजेचे; धुळ्यातील शिक्षकांच्या प्रतिक्रिया

धुळे महापालिकेच्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात शनिवारी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेच्यावेळी सदस्यांसाठी प्रश्न-उत्तराचा तास घेण्यात यावा, अशी मागणी महापौर चंद्रकांत सोनार यांच्याकडे करण्यात आल्यानंतर मागणीला मंजुरी देण्यात आली. उपस्थित सदस्यांनी आपल्या प्रभागातील समस्यांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. त्यानंतर विरोधी पक्षातील नगरसेवकांनी धुळे शहराला दररोज पाणी पुरवठा करण्याच दिलेलं आश्वासन होत की जुमला? असा फलक झळकवला.

हेही वाचा - जलसंवर्धनाची सुरुवात ही आपल्या घरापासून करणे गरजेचे, धुळेकरांचे मत

तसेच विरोधी पक्षातील काही नगरसेवकांनी मुस्लीम बहुल भागात विकास कामांच्या बाबतीत तसेच अन्य कामांच्या बाबतीत अल्पसंख्याक नागरिकांच्या प्रभागावर अन्याय होत असल्याचा आरोप केला. तर नगरसेवक साबीर शेख यांच्या सांगण्यावरून 'अल्पसंख्याक बस्ती पानी मे, धुळे महापालिका मस्ती मे, असा फलक नगरसेवकांनी झळकवला. यावरून महापौर चंद्रकांत सोनार आणि नगरसेवक साबीर शेख यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली.

यावेळी दोन्ही पक्षातील नगरसेवकांकडून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा देखील प्रयत्न झाला. यावेळी संतप्त झालेल्या नगरसेवक साबीर शेख यांनी अल्पसंख्याक प्रभागावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सभागृहात ठिय्या आंदोलन केले. महापौर चंद्रकांत सोनार यांच्याकडून शिवराळ भाषेचा देखील वापर झाला. मात्र, काही वेळाने महापौरांच्या आश्वासनानंतर हा वाद निवळला. अल्पसंख्याक प्रभागातील समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर महासभा सुरळीत सुरू झाली.

Intro:धुळे महापालिकेत आयोजित करण्यात आलेल्या महासभेत विकास कामांच्या मुद्द्यावरून आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली, यावेळी दोघंही पक्षांकडून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा देखील प्रयत्न झाला. यावेळी संतप्त झालेल्या महापौरांकडून शिवराळ भाषेचा देखील वापर झाला.

Body:धुळे महापालिकेच्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात शनिवारी महासभेचे आयोजन करण्यात आलं होतं या महासभेच्यावेळी सदस्यांसाठी प्रश्नउत्तराचा तास घेण्यात यावा अशी मागणी महापौर चंद्रकांत सोनार यांच्याकडे करण्यात आल्यानंतर ती मागणीला मंजुरी देण्यात आली. उपस्थित सदस्यांनी आपल्या प्रभागातील समस्यांचा पाढा वाचण्यास सुरुवात केल्यानंतर काही वेळाने विरोधी पक्षातील नगरसेवकांनी धुळे शहराला दररोज पाणी पुरवठा करण्याच तुम्ही दिलेलं आश्वासन होत की जुमला असा फलक झळकवला, यावेळी विरोधी पक्षातील काही नगरसेवकांनी मुस्लिम बहुल भागात विकास कामांच्या बाबतीत तसेच अन्य कामांच्या बाबतीत अल्पसंख्यांक नागरिकांच्या प्रभागावर अन्याय होत असल्याचा आरोप करत नगरसेवक साबीर शेख यांच्या सांगण्यावरून अल्पसंख्याक बस्ती पानी मे, धुळे महापालिका हमारी मस्ती मे, असा फलक झळकवला. यावरून महापौर चंद्रकांत सोनार आणि नगरसेवक साबीर शेख यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. यावेळी सत्ताधारी पक्षातील नगरसेवक आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी दोन्ही पक्षातील नगरसेवकांकडून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा देखील प्रयत्न झाला. यावेळी संतप्त झालेल्या नगरसेवक साबीर शेख यांनी अल्पसंख्यांक प्रभागावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सभागृहात ठिय्या आंदोलन केले.यावेळी महापौर चंद्रकांत सोनार यांच्याकडून शिवराळ भाषेचा देखील वापर झाला.मात्र काही वेळाने महापौरांच्या आश्वासनानंतर हा वाद निवळला. अल्पसंख्यांक प्रभागातील समस्या सोडविण्याच आश्वासन दिल्यानंतर महासभा सुरळीत सुरू झाली.Conclusion:
Last Updated : Sep 8, 2019, 12:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.