ETV Bharat / state

धुळ्यातील धाडरे गावात वीज पडून तरुणीचा मृत्यू

तरुणी शेळ्यांना चरण्यासाठी शेतात घेऊन गेली होती, त्यावेळी तिच्या अंगावर वीज कोसळल्याने तिचा आणि बकऱ्यांचा मृत्यू झाला.

धुळे
author img

By

Published : Jun 30, 2019, 9:19 PM IST

धुळे - साक्री तालुक्यातील धाडरे गावात अंगावर वीज पडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही तरुणी शेळ्यांना चरण्यासाठी शेतात घेऊन गेली होती, त्यावेळी तिच्या अंगावर वीज कोसळल्याने तिचा मृत्यू झाला. अर्चना अशोक ठाकरे (वय 15) असे मृत तरुणीचे नाव आहे. या तरुणीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी धुळे ग्रामीण आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, साक्री तालुक्यातील धाडरे या गावात आज दुपारी वीज पडली. त्यात अर्चनाचा मृत्यू झाला. अर्चना येथील लालचंद केशव मोरे यांच्यातील पाहुणी आहे. मोरे यांच्या साडूची ती मुलगी असून इयत्ता अकरावीत शिकत होती. ती आज तिच्या काकांच्या शेतात बकऱ्या फिरवण्यास (चरण्यासाठी) घेऊन गेली होती. त्यावेळी अचानक तिच्या अंगावर व तिच्याबरोबर असलेल्या चार बकऱ्यांवर वीज कोसळली.

त्यानंतर तिला तत्काळ भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रुग्णसेवक गोकुळ राजपूत व गावातील सतीश पवार व अनेकांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र, तिला वाचवण्यात अपयश आले. या घटनेत तीन बकऱ्यांचाही मृत्यू झाला. कुटुंबास तत्काळ मदत मिळून देण्यासाठी धुळे ग्रामीणचे आमदार पाटील यांनी संबंधित यंत्रणेला तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले.

Intro:धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील धाडरे गावात अंगावर विज पडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या तरुणीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी धुळे ग्रामीण आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे.Body:धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील धाडरे या गावात आज दुपारी विज पडली. त्यात लालचंद केशव मोरे यांच्याकडे त्यांच्या साडू ची मुलगी पाहुणी म्हणून अर्चना अशोक ठाकरे वय पंधरा वर्ष इयत्ता अकरावीत शिकत होती ती आज तिच्या काकांच्या शेतात बकऱ्या फिरविण्यास घेऊन गेली असता अचानक तिच्या अंगावर व तिच्याबरोबर असलेल्या तीन चार बकऱ्या वर वीज कोसळली. तिला तात्काळ भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज येथे आणले असता तिला जीवदान मिळण्यासाठी तेथील डॉक्टर व रुग्णसेवक गोकुळ राजपूत व गावातील सतीश पवार व अनेकांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र मात्र ती वाचू शकली नाही डॉक्टर स्नेहल यांनी तिला तपासून मयत घोषित केले. यात तीन बकऱ्या व व अर्चना मयत झाली ह्या कुटुंबास तात्काळ मदत मिळून देण्यासाठी धुळे ग्रामीणचे आमदार बाबासाहेब कुणाल पाटील यांनी संबंधित यंत्रणेला तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.