ETV Bharat / state

सुप्रसिद्ध वकील कुंदन पवारांना जीवे मारण्याची धमकी, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल - धुळे जिल्हा न्यायालय

शहरातील सुप्रसिद्ध वकील कुंदन पवार यांना अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

सुप्रसिद्ध वकील कुंदन पवारांना जीवे मारण्याची धमकी, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
author img

By

Published : Jul 3, 2019, 12:03 AM IST

धुळे - शहरातील सुप्रसिद्ध वकील कुंदन पवार यांना अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. खटल्यामध्ये रस न दाखवण्याचा इशारा त्यांना देण्यात आला असून, त्यांना ही धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. याप्रकरणी धुळे जिल्हा वकील संघाच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रसिद्ध वकील कुंदन पवारांना जीवे मारण्याची धमकी, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

धुळे जिल्हा न्यायालयातील वकील कुंदन पवार हे न्यायालयात काम करत असतांना त्यांच्या नावाने एक लिफाफा आला. काम पूर्ण झाल्यावर त्यांनी तो लिफाफा उघडला असता त्यामध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. बबलू उर्फ निलेश सुरेश गायकवाड आणि सागर पगारेच्या खटल्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट घेतला तर तुमचा गेम वाजवू, अशा भाषेत पवार यांना धमकी देण्यात आली आहे.

हे पत्र निनावी असून या पत्रामुळे वकील संघात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी धुळे जिल्हा वकील संघाच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून याबाबत पोलीस महासंचालकांची भेट घेणार असल्याची माहिती कुंदन पवार यांनी दिली.

Intro:धुळे शहरातील सुप्रसिद्ध वकील कुंदन पवार यांना अज्ञात इसमाने जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. केसमध्ये रस न दाखवण्याचा ईशारा त्यांना देण्यात आला असून हि धमकी त्यांना निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. याप्रकरणी धुळे जिल्हा वकील संघाच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Body:
धुळे जिल्हा न्यायालयातील वकील कुंदन पवार हे न्यायालयात काम करत असतांना त्यांच्या नावाने एक लिफाफा आला. काम पूर्ण झाल्यावर त्यांनी तो लिफाफा उघडला असता त्यात त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. सेशन केस क्रमांक २७/२०१९ या केसमधील बबलू उर्फ निलेश सुरेश गायकवाड आणि सागर पगारेच्या केसमध्ये तुम्ही इंटरेस्ट घेतला तर तुमचा गेम वाजवू अश्या भाषेत कुंदन पवार यांना धमकावण्यात आलं आहे. हे पत्र निनावी असून या पत्रामुळे वकील संघात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी धुळे जिल्हा वकील संघाच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच याबाबत आपण पोलीस महासंचालकांची भेट घेणार असल्याची माहिती कुंदन पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.