ETV Bharat / state

धुळे जिल्ह्यात 'रेमडीसीवर'चा तुटवडा; रुग्णाच्या नातेवाईकांना चकरा मारूनही औषध मिळेना

खासगी रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक शहरासह जिल्हाभरातील औषध दुकानांमध्ये फिरताना दिसत आहेत. त्यात अनेकांना औषध न मिळाल्याने हताश होत रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.

धुळे
धुळे
author img

By

Published : Apr 3, 2021, 7:10 PM IST

धुळे - जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडीसीवर इंजेक्शनचा प्रचंड तुडवडा जाणवत आहे. नागरिकांना मोठा त्रास होताना दिसत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये दाखल कोरोना रुग्णांना रेमडीसीवरची गरज असेल तर नातेवाईकांना ज्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे, त्या शब्दांपलिकडच्या आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध असले तरी खासगी रुग्णालयांमधील रुग्णांना जीवन मृत्यूच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे.

धुळे जिल्ह्यात रेमडीसीवरचा तुटवडा

खासगी रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक शहरासह जिल्हाभरातील औषध दुकानांमध्ये फिरताना दिसत आहेत. त्यात अनेकांना औषध न मिळाल्याने हताश होत रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. अनेक रुग्णांना आपला जीव देखील गमवावा लागत आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने सामान्य जनतेला रेमडीसीवर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहेत.

गौतम थोरातने सांगितली आपबिती

गौतमचे नातेवाईक धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील एका रुग्णालयात कोरोनाचा उपचार घेत आहेत. त्यांना रेमडीसीवर इंजेक्शनची गरज आहे. हे इंजेक्शन शोधत गौतम धुळ्यातपर्यंत पोहचला. धुळ्यात १० पेक्षा अधिक औषध दुकानांमध्ये त्यांनी चौकशी केली. मात्र एकाही औषधालयात हे इंजेक्शन त्याला मिळाले नाही. दिवसभर तो ते औषध शोधत होता, या संदर्भात बोलताना त्याने प्रशासनाला औषध उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

रेमडीसीवरचा मुबलक साठा असल्याचा औषध प्रशासनाचा दावा

जिल्ह्यात रेमडीसीवरची मागणी एवढी मोठी आहे कि, एक-एका औषध दुकानात १०० पेक्षा अधिक इंजेक्शनची मागणी नोंदवली गेली आहे. मात्र, हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने औषध दुकानचालकांचा नाईलाज होत आहे. इंजेक्शन बनविणाऱ्या कंपनींकडून पुरेसा पुरवठा होत नसल्याने हा तुटवडा निर्माण झाल्याचे दुकानचालक हतबलपणे सांगत आहेत. या इंजेक्शनची उपयोगिता वेळही थोडी राहत असल्याने त्या काळात ते विकले गेले नाहीत तर ते वाया जाण्याचे प्रमाणही मोठे आहे. जिल्ह्यात रेमडीसीवर मिळत नसता अन्न व औषध प्रशासन सर्वकाही आलबेल सुरू असल्याचे सांगत आहे. जिल्ह्यात रेमडीसीवरचा पुरेसा साठा असल्याचे औषध प्रशासनाचे सहआयुक्त जाधव सांगत आहेत. रेमडीसीवरचा काळा बाजार होत आहे का? याबाबतही प्रशासन बेफिकीर आहे.

औषध प्रशासनाचे दावे हे औषध दुकानांवर फिरल्यावर किती पोकळ आणि वस्तुस्थितीला धरून नाहीत, हे स्पष्ट होते. अनेक डॉक्टर आवश्यकता नसतानाही रेमडीसीवर देत असल्याच्या चर्चा आहेत. एकीकडे इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुडवडा आहे तर दुसरीकडे काही खासगी डॉक्टरांचा सर्रास रेमडीसीवरचा वापर या सर्वात रुग्णच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे हे स्पष्ट आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धुळ्याप्रमाणेच स्थिती आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.