ETV Bharat / state

भ्रष्टाचारी लोकांना आराम द्या - जे पी नड्डा - धुळे भाजप लेटेस्ट न्यूज

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवारा जयकुमार रावल यांच्या प्रचारार्थ भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची सभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

जे पी नड्डा यांची धुळे जिल्ह्यात सभा झाली
author img

By

Published : Oct 14, 2019, 10:39 PM IST

धुळे - गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने भ्रष्टाचार केला, आता त्यांची ईडी चौकशी सुरू झाली आहे. या चौकशांना त्यांना आता सामोरे जावे लागत आहे. भ्रष्टाचारी लोकांना आराम द्या आणि इमानदार लोकांना काम द्या अस असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दोंडाईचा येथे झालेल्या सभेत केले.

जे पी नड्डा यांची धुळे जिल्ह्यात सभा झाली

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार आणि राज्याचे पर्यटनमंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या प्रचारार्थ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची दोंडाईचा येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत जे पी नड्डा यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली. यावेळी बोलताना जे पी नड्डा म्हणाले, ही निवडणूक कोणाचीही नसून महाराष्ट्राला घडवणारी निवडणूक आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने अनेक घोटाळे केले. मात्र, आदर्श घोटाळा देखील केला, मतदानाच्या दिवशी योग्य बटन दाबले तर विकास होतो. चुकीचे बटन दाबले तर विध्वंस होतो.

महाराष्ट्र कमी ताकदवान नव्हता, महाराष्ट्रातील लोक कमजोर नव्हते. मात्र, महाराष्ट्रातील नेते कमजोर होते. 70 वर्ष महाराष्ट्र आणि दिल्लीत काँग्रेसचे नेते होते, काँग्रेसच्या नेत्यांनी कमजोरी निर्माण केली. त्यांच्यातील वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांची पाच वर्षे पूर्ण केली. काँग्रेसचे नेते संगीत खुर्ची खेळत होते, असा सणसणीत टोला काँग्रेस आणि विरोधकांवर जे पी नड्डा यांनी यावेळी लगावला. यावेळी जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांनी भाजपात प्रवेश केला.

Intro:गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने भ्रष्टाचार केला आता त्यांची ईडी चौकशी सुरू झाली आहे, या चौकशांना त्यांना आता सामोरं जावं लागत आहे भ्रष्टाचारी लोकांना आराम द्या आणि इमानदार लोकांना काम द्या अस असं आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दोंडाईचा येथे झालेल्या सभेत केलं.
Body:विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार आणि राज्याचे पर्यटनमंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या प्रचारार्थ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची दोंडाईचा येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत जे पी नड्डा यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली, यावेळी बोलताना जे पी नड्डा म्हणाले, ही निवडणूक कोणाचीही नसून महाराष्ट्राला घडवणारी निवडणूक आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीने अनेक घोटाळे केले मात्र आदर्श घोटाळा देखील केला, मतदानाच्या दिवशी आपलं बोट योग्य ठिकाणी दाबलं तर विकास होतो आणि चुकीच्या ठिकाणी दाबलं तर विध्वंस होतो, महाराष्ट्र कमी ताकदवान नव्हता, महाराष्ट्रातील लोक कमजोर नव्हते मात्र महाराष्ट्रातील नेते कमजोर होते, 70 वर्ष महाराष्ट्र आणि दिल्लीत काँग्रेसचे नेते होते, काँग्रेसच्या नेत्यांनी कमजोरी निर्माण केली, त्यांच्यातील वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांची पाच वर्षे पूर्ण केली, काँग्रेसचे नेते संगीत खुर्ची खेळत होते, असा सणसणीत टोला काँग्रेस आणि विरोधकांवर जे पी नड्डा यांनी यावेळी लगावला. यावेळी जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांनी भाजपात प्रवेश केला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.