धुळे - येथे राज्याचे पर्यटन, अन्न व औषध प्रशासन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांना मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहण्याचे निर्देश दिले.
धुळे येथे मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांना मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आदेश दिले. धुळे जिल्ह्यात ५ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी ४ जागांवर भाजप लढली होती. मात्र, केवळ २ जागांवरच पक्षाला यश मिळाले. तर, साक्री आणि धुळे ग्रामीणच्या जागेवर भाजपचा पराभव झाला. आता या पाचही जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी करावी, असे निर्देश रावल यांनी दिले आहेत.
हेही वाचा - शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू, कावठी गावातील घटना
साक्री व धुळे ग्रामीणमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर जे मतदान झाले त्यात आणखी 5 ते 10 हजार मते जमविण्यासाठी रणनीती ठरविली गेली. याबाबत जयकुमार रावल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, धुळे जिल्ह्यात भाजपला चारही जागेवर यश मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, आम्हाला केवळ दोनच जागेवर यश मिळाले आहे. यावेळी भाजपतर्फे ५ जागा लढविण्यात येतील आणि पाचही जागांवर यश मिळविण्यात येईल. त्या दृष्टीने पक्षाचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत असे ते म्हणाले.
हेही वाचा - कोणी घर देता का रे घर..?, धुळ्याच्या 'नटसम्राटाची' आपल्या पाल्यांकडून अवहेलना