धुळे - देवपूरमधील पांझरा नदीपात्रात मृत अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित अर्भक पुरुष जातीचे असून या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी गर्दी केली होती.
या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. या अर्भकाच्या पालकांचा अद्याप शोध सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील सुभाष पुतळा चौक परिसरात अशाच प्रकारचे अर्भक आढळले होते. यानंतर काही महिन्यांतच पुनरावृत्ती झाल्याने खळबळ उडाली आहे.