धुळे- सध्या देशात 'मेक इन इंडिया' वर केंद्र सरकारचा भर आहे. जास्तीत जास्त वस्तूंची निर्मित देशात व्हावी असे सरकारचे ध्येय आहे. या ध्येयाला मूर्तरूप देण्याचे कार्य देशातील एका उद्योजकाने केले आहे. अमोल यादव यांनी १९ वर्षांच्या अथक प्रयत्नातून स्वदेशी विमानाची निर्मिती केली आहे. त्यांच्या या विमानाच्या व्यावसायिक उड्डाणाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
धुळे शहराजवळील गोंदूर विमानतळ येथे हे विमान बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भारताने भारतासाठी तयार केलेले हे विमान असून याचा उपयोग भविष्यात देशाला होणार असल्याचा विश्वास अमोल यादव यांनी व्यक्त केला आहे. भारतात विमानाची निर्मिती होऊ शकत नाही, असा सरकारमधील अधिकार्यांचा समज आहे. त्यांचा हा दृष्टिकोन माझ्यासारख्या नव्या उद्योजकांसाठी मारक ठरत असून अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन बदलून त्यांच्यात इच्छाशक्ती निर्माण होण्याची आवश्यकता आहे, असे अमोल यादव यांनी सांगितले.
तसेच, देशात विमान उड्डाणासाठी परवानगी देण्याबाबत सरकारी अधिकाऱ्यांच्या निरुत्साहावर अमोल यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्याशी संवाद साधला आहे, आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी.
हेही वाचा- कोंडाईबारी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक कोंडी, पावसामुळे काम संथगतीने