ETV Bharat / state

Manoj More support Eknath Shinde : उद्धव ठाकरेंना धुळ्यात धक्का, सेनेचे महानगर प्रमुखांसह सात जण शिंदे गटात - supported Eknath Shinde

शिवसेनेचे धुळे महानगर प्रमुख मनोज मोरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी आपल्या समर्थकांसह रविवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिंदे ( Manoj More support Eknath Shinde ) गटाला पाठिंबा दिला. हिंदुत्व तसेच धुळे शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांना पाठिंबा दिल्याचे मनोज मोरे यांनी सांगितले आहे. त्याच्या जाण्यामुळे धुळ्यात शिवसेनेला खिंडार पडले असून उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Manoj More support Eknath Shinde
मनोज मोरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला
author img

By

Published : Jul 25, 2022, 8:29 PM IST

धुळे - शिवसेनेचे धुळे महानगर प्रमुख मनोज मोरे ( Manoj More ) यांनी आपल्या समर्थकांसह रविवारी मुंबईत शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत धुळे शहराच्या विकासासाठी शिंदे यांना पाठिंबा ( Manoj More support Eknath Shinde ) दिल्याचे मनोज मोरे म्हणाले. शिवसेनेचे धुळे महानगर प्रमुख मनोज मोरे यांनी आपल्या समर्थकांसह रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांची भेट घेतली. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर तसेच धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांचा वारसा लाभलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिल्याचं मनोज मोरे यांनी सांगितले. यावेळी माजी कृषी मंत्री दादा भुसे, धुळे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अब्दूल सत्तार, निरीक्षक अनिल भोर , निरीक्षक रेडकर उपस्थित होते.

मनोज मोरेंचा एकनाथ शिंदेंना पाठिंवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास - २४जुलै रोजी सायंकाळी मुंबई येथील नंदनवन निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत धुळे महानगराच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दर्शवत पाठिंबा दिला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज मोरे यांना जोरात काम करा. धुळे शहराच्या विकासासाठी मी तुमच्या पाठिशी आहे. यावेळी उपस्थित आमदार दादा भुसे, आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, आपण मनोज मोरेंसोबत रहा सर्वांनी मिळून आपण धुळे शहराचा विकास करू या. यावेळी मोरे यांनी शिवसेनेत केलेल्या कामाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. त्यांचा कार्याचा अहवाल बघून केलेल्या कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक करत मनोज मोरे यांना आशीर्वाद दिले.

हेही वाचा - Plane Crashed in Indapur: पुण्यात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले; जाणून घ्या, आतापर्यंत कुठे-कुठे झाल्या विमान दुर्घटना

यांनी दिला शिंदे गटाला पाठिंबा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदें गटाला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये मनोज मोरे यांच्यासह शिवसेनेचे धुळे शहर संघटक संजय वाल्हे, उपमहानगर प्रमुख बाळासाहेब आगलावे, उपमहानगर प्रमुख समाधान शेलार, उपविभाग प्रमुख शेखर बडगुजर, उपविभाग प्रमुख निलेश मराठे, सुयोग मोरे यांचा समावेश आहे. दरम्यान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ. तुळशीराम गावीत, धुळे महानगर प्रमुख सतीश महाले हे अगोदरच एकनाथ शिंदे गटात सामील झालेत . आता शिंदे गटाला शिवसेनेच्या आणखी सात जणांनी पाठिंबा दिल्यानं उद्धव ठाकरेंना हा धुळ्यात मोठा धक्का मानला जातो आहे.

हेही वाचा - Arjun Khotkar : दोन दिवसांपूर्वी बंडखोरांना 'उंदीर' म्हणणारे शिवसेनेचे 'अर्जुन' शिंदे गटात?; चर्चेला उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.