ETV Bharat / state

धुळे : कौटुंबीक वादातून पतीने केली पत्नीची हत्या

साक्री तालुक्यात कौटुंबीक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी गजाने वार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मारेकरी शिवाजी खैरनार याला पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे.

धुळे: कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या
author img

By

Published : Jun 17, 2019, 11:09 PM IST

धुळे - साक्री तालुक्यात कौटुंबीक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी गजाने वार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी घडली असून या घटनेमुळे साक्री तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मारेकरी शिवाजी खैरनार याला पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे.

जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील विटाई गावात राहणाऱ्या किरणबाई खैरनार आणि शिवाजी खैरनार यांच्यात कौटुंबीक वादातून नेहमीच भांडणे होत असत. मात्र सोमवारी हा वाद विकोपाला गेला आणि शिवाजी याने संतापाच्या भरात किरणबाई यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

रॉडने वार केल्यानंतर किरणबाई शिवाजी खैरनार या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. आपला जीव वाचविण्यासाठी त्या आरडाओरड करत होत्या. मात्र ही भांडणे नेहमीचीच असल्याने शेजाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. किरणबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या असताना देखील शिवाजी वार करत होता.

घटनेनंतर शिवाजी खैरनार आणि अन्य २ जण घटनास्थळावरून फरार झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी शिवाजी खैरनार याची माहिती ग्रामस्थांकडून घेतली आणि त्याच्या नातेवाईकांसह इतर ठिकाणी पथके रवाना केली. घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी शिवाजी खैरनार याला अटक केली आहे.

Intro:कौटुंबिक वादातून पटीने पत्नीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याची घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घडली आहे. हि घटना सोमवारी घडली. मात्र या घटनेनंतर मारेकरी शिवाजी खैरनार याला पोलिसांनी काही तासातच अटक केली असून या घटनेमुळे साक्री तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. Body:

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील विटाई गावात राहणाऱ्या किरणबाई खैरनार आणि शिवाजी खैरनार यांच्यात कौटुंबिक वाद होते. कौटुंबिक वादातून त्यांच्यात नेहमी भांडण होत असे. मात्र सोमवारी हा वाद विकोपाला गेला. या वादातून शिवाजी याने संतापाच्या भरात किरणबाई यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. या घटनेत ती गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर शिवाजी खैरनार आणि अन्य २ जण घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे हे घटनास्थळी दाखल झाले. फरार झालेला शिवाजी खैरनार हा नेमका कुठे जाऊ शकतो याची माहिती पोलिसांनी ग्रामस्थांकडून घेतली. त्याच्या नातेवाईकांसह इतर ठिकाणी पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केलीत. पोलिसांनी काही तासातच शिवाजी खैरनार याला अटक केली आहे. घटनेनंतर किरणबाई शिवाजी खैरनार ह्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. शिवाजी खैरनार हा मारहाण करीत असताना त्या जीव वाचविण्यासाठी आरडाओरड करत होत्या मात्र हे भांडण नेहमीचे असल्याने शेजाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. किरणबाई ह्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या असताना देखील शिवाजी हा वार करीत राहिला. या भयंकर घटनेने साक्री तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.