धुळे - शिरपूर शहरात मध्यरात्री जयेश सेल्स & सर्विसेस दुकानाला अचानक आग लागल्याने संपूर्ण दुकानच जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने दुकानाजवळच असलेल्या विजवाहीनीच्या डिपीजवळ आग पोहचली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या आगीत दुकानाचे 15 ते 16 लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
साहित्य जळून खाक
प्राथमिक माहितीनुसार शहरातील पातळेश्वर मंदीराजवळील पाताळेश्वर कॉम्प्लेक्समधील जयेश सेल्स & सर्विसेस या दुकानाला भीषण आग लागली. यात संपूर्ण दुकानातील गॅस ग्रीझर, मिक्सर, सेगड्या, लहान चक्की, कुलर, बजाजचे कंपनीचे इलेक्ट्रॉनीक वस्तू आदी साहीत्य यात जळून खाक झाले आहे. सुमारे 15 ते 16 लाखांचे नुकसान झाल्याचे माहिती आहे. यात दुकानाजवळ विजवाहीनीची डिपी होती. सुदैवाने त्या डिपीपर्यंत आग पोहचली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. मात्र या आगीत जयेश सेल्स & सर्विसे या दुकानातील संपूर्ण दुकान जळून खाक झाली आहे. घटनास्थळी तत्काळ पोलीस यंत्रणा दाखल झाली, कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्वत्र प्रयत्न करण्यात येत होते. शिवाय शिरपूर नगरपरिषदेचे अग्निशमन वाहनाला बोलविण्यात आले होते. मात्र घटनास्थळी अग्निशमन वाहन आल्यानंतर 20 ते 25 वाहनात बिघाड असल्याने पाणी पुरवठा होऊ शकला नाही. दुसऱ्या अग्निशमन बंबाला बोलविण्यात आले त्यानंतर आग आटोक्यात आली आहे.
हेही वाचा -फोटो पाहा, अरुणाचलच्या अंजावमध्ये पेटलेल्या वणव्याशी सैनिकांची झुंज