ETV Bharat / state

घरात बसा सांगण्याचा राग आल्याने अजंदे सरपंचास मारहाण - shirpue news

घरातच बसा एवढेच बोलल्यावर अजंदे गावाचे सरपंच राजेंद्र पाटील यांना गावातील काही तरुणांनी राग आल्याने दगड काठीच्या साह्याने जबर मारहाण करून जखमी केले.

dhule sarpanch
घरात बसा सांगण्याचा राग आल्याने अजंदे सरपंचास मारहाण
author img

By

Published : Mar 31, 2020, 10:39 AM IST

धुळे - कोरोना व्हायरसच्या संसर्गातून बचाव करण्यासाठी संचारबंदी सुरू आहे. काही ठिकाणी मात्र गावातील लोक न जुमानता घराबाहेर पडत आहेत. अशाच बाहेर गर्दी करून उभे असलेल्यांना घरात बसा, असे सांगण्याचा राग आल्याने धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अजंदे गावात सरपंचास मारहाण केल्याची घटना घडली.

घरात बसा सांगण्याचा राग आल्याने अजंदे सरपंचास मारहाण
संचारबंदी दरम्यान गावात एकत्र उभे राहू नका. घरातच बसा एवढेच बोलल्यावर अजंदे गावाचे सरपंच राजेंद्र पाटील यांना गावातील काही तरुणांनी राग आल्याने दगड काठीच्या साह्याने जबर मारहाण करून जखमी केले आहे. सरपंच राजेंद्र पाटील यांना उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.