धुळे - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या उपस्थित धुळे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकार्यांची बैठक पार पडली.
यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात करून आबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे ही वाढ रोखण्यासाठी नागरिकांनी लक्षणे दिसताच त्वरित तपासणी करून घ्यावी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये वाढणारी गर्दी ही शासकीय रुग्णालयांमध्ये देखील वाढवण्यासाठी त्या ठिकाणी योग्य त्या सोयी सुविधा पुरवण्यावर भर देण्याबाबत च्या सूचना येथील प्रशासनाला देण्यात आले आहेत तसेच रेमडीसिवर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी वाढल्या आहेत याबाबत देखील आम्ही ठोस कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी या वेळी बोलताना दिली.
या ब्रेक दी चैन या संकल्पनेनंतर देखील नागरिक ऐकत नसल्यामुळे नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे अखेर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय देखील घ्यावा लागेल, जर नागरिकांना लॉकडाऊन नको असेल तर शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी नागरिकांना केले आहे.
हेही वाचा - मुंबईत कोरोना वाढला; राणीबाग ३० एप्रिलपर्यंत राहणार बंद
रेमडीसीवर इंजेक्शनच्या वापराबाबत राज्य शासनाने निर्धारित केलेल्या मार्गर्दर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन टोपे यांनी यावेळी केले. खासगी डॉक्टरांना रेमडीसीवर इंजेक्शनचा वापर आवश्यकतेप्रमाणे करावा असी आवाहन टोपे यांनी केले आहे. राज्यात ५० हजार रेमडीसीवरचा पुरवठा होता आणि तितकाच खप होत आहे. त्यामुळे शासन निर्देशाप्रमाणे ए , बी , सी , डी आणि इ अश्या विभागनीत रुग्णांची वर्गवारी करून ज्या रुग्णांना त्याची गरज आहे त्यांना रेमडीसीवर देण्यात यावे असे सांगत राज्यात व्हेंटीलेटरचा तुटवडा जाणवू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून , त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठीसुद्धा प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी धुळ्यात सांगितले.
लसीकरण
राज्यात पुरेसा कोरोना लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण केंद्र वाढवायला अडचणी निर्माण होत असल्याची धक्कादायक माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. धुळ्याप्रमाणे अनेक ठिकाणी हीच अडचण असल्याने याबाबत आपण केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्याशी बोललो असल्याचं टोपे यांनी धुळे दौऱ्यात स्पष्ट केले आहे. राज्य कोरोना लसीकरणात क्रमांक एकवर आहे. कोरोनाचा फैलाव पाहता अजून वेग या लसीकरणाला देणे गरजेचे आहे. मात्र, लसीचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याने लसीकरण केंद्र वाढता येत नसल्याची अडचण टोपे यांनी मांडली आहे.
अधिक मृत्यू
नागरिक वेळेवर कोरोना उपचार घेत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी धुळ्यात स्पष्ट केले आहे. नागरिकांनी थोडी लक्षण असली तरी तात्कळ कोरोना चाचणी करून घ्यावे आणि उपचार सुरु करावे असे आवाहन टोपे यांनी केले आहे. रुग्ण उशिरा उपचारासाठी दाखल होत असल्याने स्थिती खराब होते. प्रयत्न करूनही रुग्णाचा जीव वाचवता येत नाही. त्यामुळे वेळेवर रुग्ण दाखल झाले तर त्यांचे जीव वाचवलंत येतील. नागरिकांनी सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार दाखल होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
व्हायरसचा प्रकार
गेल्या एक महिन्यापासून राज्य सरकार एन सी डी सी कडे पाठपुरावा करून राज्यातील कोरोना व्हायरसचे स्ट्रेन कोणते हे जाणून घेण्याचा पर्यंत करीत आहे. मात्र एन सी डी सी प्रतिसाद देत नसल्याचा आरोप आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. राज्यात ब्राझील अथवा यु के चा स्ट्रेन आहे हे जाणून घेण्यासाठी राज्यात प्रयोग शाळांमधून नमुने पाठविण्यात आले आहे. या नमुन्यांचे अहवाल काय आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे मात्र एन सी डी सी माहिती देत नसल्याचं टोपे यांनी सांगितले आहे.
मृत्यू लपवणे
राज्यात कोरोना मृतांचे आकडे लावलेले जात असल्याच्या मुद्द्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी धुळ्यात स्पष्टीकरण दिले आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटरच्या कमतरतेमुळे वेळीच कोरोना मृतांचा, सुट्टी झालेल्या रुग्णांची माहिती अद्यावत होत नसल्याचे टोपे यांनी मान्य करीत हे ऑपरेटर लवकरच भरून हि माहिती अद्यावत करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या पारदर्शकपणे समोर आणली जात आहे. त्यामुळे माहिती भरून घेण्यात मागे पुढे होत असले तरी लवकरच वेळेवर माहिती भरून घेऊन पारदर्शक माहिती जनतेसमोर ठेवणार असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - आजपासून शिर्डीचे साईबाबा समाधी मंदिर भाविकांसाठी राहणार बंद