धुळे: बारा तलवारी, दोन गुप्ती, एक चॉपर, एक बटनचा चाकू, दोन फाईटर, एक मारुती कंपनीची इर्टीगा (गाडी क्रमांक- एम एच -०४-एफ झेड -२००४) असा एकूण ६ लाख २९ हजार १०० रुपयांचा मुद्देमालसह १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला. या दहा जणांमध्ये ४ जण ट्रॅक्टर व्यावसायिक, एक पाणीपुरी व्यावसायिक तर अन्य पाच जणांमध्ये चार मजुरी करणारे, एक खाजगी नोकराचा समावेश आहे. हे दहा युवक २० ते ४५ वयोगटातील आहेत. ते सर्व धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवाशी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रांचा वापर घातपात करण्यासाठी होणार होता का? याचा देखील तपास पोलीस करत आहेत. शिरपूर ग्रामीण पोलिसांच्या या कामगिरीचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी कौतुक करत दहा हजाराचा रिवार्ड दिला. तसेच संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
काय आहे नेमके प्रकरण?: मुंबई- आग्रा महामार्गावरून पांढर्या रंगाच्या कारमधून काही जण इंदूरकडून धुळ्याकडे शस्त्रसाठा घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने हाडाखेड तपासणी नाक्याजवळ नाकाबंदी केली. साधारण दुपारी तीन वाजेच्या सुमारास ती संशयित कार (क्र.एमएच ०४ एफ.झेड. २००४) नाक्याजवळ येताच पोलीस पथकाने त्या वाहनाला रोखले. कारमधील दहा संशयितांना खाली उतरवत पोलीस पथकाने कारची तपासणी केली आणि पोलीस पथक देखील चक्रावले. त्या वाहनात मोठा शस्त्रसाठा आढळून आला. पोलिसांनी हत्यारांसह गुन्हेगारांनी वापरलेले वाहन असा एकूण ६ लाख २९ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करत गुन्हेगारांना ताब्यात घेतले.
गुन्हेगारांमध्ये यांचा समावेश: सतपाल गिरधर सोनवणे (राहणार लळींग,तालुका, जिल्हा धुळे), किरण नंदलाल मराठे (राहणार जुन्नर,तालुका जिल्हा धुळे), विकास देवा ठाकरे, सकाराम रामा पवार (दोघे राहणार लळींग,तालुका,जिल्हा धुळे), सचिन राजेंद्र सोनवणे (राहणार अवधान,धुळे.), राजू पवार, अमोल शांंताराम चव्हाण, संतोष नामदेव पाटील (तिघे राहणार जुन्नेर तालुका, जिल्हा धुळे), विशाल विजय ठाकरे, विठ्ठल हरबा सोनवणे (दोघे राहणार लळींग) या दहा जणांचा समावेश आहे. या दहाही जणांविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह मुंंबई पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.