धुळे - इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा ग्वाही माजी केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री आणि खासदार सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा इंदूर-मनमाड रेल्वे मार्ग हा फक्त आणि फक्त धुळेकरांच्या भावनांशी खेळून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी होत आहे, असा आरोप वेळोवेळी विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र, या रेल्वे मार्गासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उद्घाटन देखील झाले आहे. तसेच 2016 च्या रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गाला मंजुरी मिळाली आहे आणि त्याची नोंद रेल्वेच्या पिंग बुकात देखील करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच या प्रकल्पाच्या निधीचा अर्धा हिस्सा रेल्वे विभाग आणि अर्धा हिस्सा महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकार यांच्याकडून उभे केला जाईल असे ठरले आहे. म्हणून इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाचे काम प्रगतिपथावर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. भामरे पुढे म्हणाले, बहुचर्चित असलेला मनमाड धुळे इंदूर रेल्वे मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या या मार्गावरील भूमि अधिग्रहणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन याआधीच झाल्याने हा मार्ग निश्चित पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी केला आहे.
हेही वाचा - उद्धव ठाकरेंना सीएएची पुन्हा ओळख करून देण्याची गरज; मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर मनीष तिवारींचे ट्वीट
ते म्हणाले, मनमाड धुळे-इंदूर रेल्वे मार्ग झालाच पाहिजे, अशी मागील चाळीस वर्षांपासून उत्तर महाराष्ट्रातील जनतेची मागणी होती. 2014 मध्ये मला खासदार म्हणून जनतेने निवडून दिले. त्यानंतर या मार्गाच्या काम पूर्णत्वास नेण्यासाठी माझे प्रयत्न सुरू झाले. तसेच मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू करण्यात आला. त्यांच्याकडूनही योग्य तो प्रतिसाद मिळाला आहे.
या मार्गाचे काम जेएनपीटीच्या माध्यमातून करावा, असे मंत्री गडकरी यांनी सुचविले होते. या मार्गासाठी असलेला डीपीआर देखील बनवण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचा वेळ लागतो, असे सांगत अन्य प्रकल्प पेक्षा मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचे काम जलद गतीने सुरू आहे. हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.