धुळे - लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध केंद्रांवर नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवला.
धुळे लोकसभा मतदार संघात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. सकाळपासून नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवण्यासाठी मतदान केंद्रांवर प्रचंड गर्दी केली होती. वयोवृद्ध मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच नवमतदारांनीदेखील आपला मतदानाचा हक्क बजवला. तरुणांनी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही बळकट करावी असे मत नवमतदारांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले. मतदानादिवशी घरी न बसून राहता मतदान करावे, अशी अपेक्षा नवमतदार तरुणीने व्यक्त केली.