धुळे: १९ वर्षीय सून घरात झोपलेली असताना तर सुनेची सासू टॉयलेटला गेल्याची संधी साधून ५६ वर्षीय चंद्रकांत जनार्धन मोहिते याने दारूच्या नशेत घरात प्रवेश करून झोपलेल्या सुनेच्या अंगावर झोपून लज्जास्पद वाटेल, असे कृत्य केल्याची घटना घडली आहे.
सासूला देखील शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण: धुळे शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरात असलेल्या सदिच्छा नगर भागात १४ नोव्हेंबरच्या सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. पीडित सुनेने सासऱ्याच्या कृत्याला विरोध करत मोठ्याने ओरडली. सुनेचा आवाज ऐकून सासू आली. तर त्या नराधमाने त्याच्या पत्नीला अर्थात सुनेच्या सासूला देखील शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली आहे.
नराधम सासऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल: हा सर्व आरडाओरड, गोंधळ ऐकून पीडित महिलेचा पती त्या ठिकाणी आलेला पाहून नराधम बापाने अर्थात सुनेच्या सासऱ्याने त्याला देखील दगड, वीट मारून जखमी केले आहे. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेने धुळे शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार नराधम सासऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊन सासरा चंद्रकांत जनार्धन मोहिते याला अटक करण्यात आली आहे.