धुळे - सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी धुळे शहराचे माजी महापौर भगवान करनकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना आजाराबाबत धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिले आहेत. मात्र यानंतरही अनेकांकडून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केल्या जात आहेत.
शहराचे माजी महापौर भगवान करनकाळ यांनीदेखील फेसबुकवर धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकली होती. याप्रकरणी भगवान करनकाळ यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.