ETV Bharat / state

मी पण रोज मासे खातो, मग माझे डोळे..., नितेश राणेंचा विजयकुमार गावितांना चिमटा; तर मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण - Nitesh Rane vijaykumar gavit

राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी, 'मासे खाल्याने डोळे सुंदर होतात', असे विधान केले आहे. आता त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. गावित यांच्या या विधानावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी त्यांना जोरदार चिमटा काढला. तर मंत्री गावित यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिले.

Nitesh Rane vijaykumar gavit
नितेश राणे विजयकुमार गावित
author img

By

Published : Aug 21, 2023, 7:10 PM IST

Updated : Aug 21, 2023, 9:40 PM IST

पहा काय म्हणाले विजयकुमार गावित

धुळे : आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 'अभिनेत्री ऐश्वर्या राय रोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे सुंदर आहेत', असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्याची आयती संधी मिळालीय.

मी आदिवासी समाजाला संबोधित करत असल्याने त्यांना एक आदर्श उदाहरण दाखवणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. प्रसारमाध्यमांनी ते विधान संदर्भ न देता दाखवले. मलाही मुली आहेत आणि ऐश्वर्या माझ्या मुलीसारखी आहे, ती एक चांगली स्त्री आहे. लोकांना फिश ऑइलचे फायदे समजावून सांगणे सोपे नाही हे ऐश्वर्यालाही माहिती असेल. अरबी समुद्रातील मासे आरोग्यासाठी चांगले आहेत. मासे हे डोळ्यांसाठी तसेच संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहेत - विजयकुमार गावित, मंत्री

नितेश राणे म्हणाले मी पण रोज मासे खातो : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या वक्तव्यावरून गावित यांच्यावर सडकून टीका केली. 'मंत्र्यांनी अशा फालतू टिप्पणी करण्याऐवजी आदिवासींना भेडसावणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं मिटकरी म्हणाले. गावित यांच्या या विधानावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनीही त्यांना चिमटा काढला. 'मी पण रोज मासे खातो. त्यामुळे माझे डोळे तसे (ऐश्वर्या रायसारखे) व्हायला हवे होते. गावित साहेबांचे याबाबत काही संशोधन असेल तर मी विचारेन', असं आमदार राणे म्हणाले.

काय म्हणाले होते विजयकुमार गावित : धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे आदिवासी मासेमारांना मासेमारीचे साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी एक विधान केले. 'अभिनेत्री ऐश्वर्या राय मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे व त्वचा सुंदर आहे. तुम्ही देखील मासे खा आणि डोळे सुंदर करा. म्हणजे तुम्हाला जिला पटवायचे आहे तिला पटवता येईल', असे विजयकुमार गावित म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

मासे सेवन केल्याने त्वचा चिकनी होते : 'जे लोक रोज मासे सेवन करतात त्यांची त्वचा चिकनी होते आणि त्यांचे डोळे चमकतात. त्यामुळे तुमच्याकडे कोणी पाहिलं तर ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल. मी तुम्हाला ऐश्वर्या रायबद्दल सांगितलं. ती मंगळुरूमध्ये समुद्रकिनारी राहत होती. ती रोज मासे खात असे. तिचे डोळे बघितले का? तुमचेही डोळे तिच्यासारखे होतील', असे मंत्री विजयकुमार गावित म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन चांगलेच वादळ उठले आहे. त्यांच्यावर अनेक मीम्सही आता तयार व्हायला लागली आहेत.

हेही वाचा :

  1. Ghee For Skin : तुपाने चेहऱ्याचे सौंदर्य वाढवा, फक्त या पद्धतीचा करा वापर...
  2. Mushroom Side Effects : पचनाच्या समस्यांपासून ते लठ्ठपणापर्यंत, जाणून घ्या मशरूम खाण्याचे दुष्परिणाम

Last Updated : Aug 21, 2023, 9:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.