धुळे : (Dhule) शहरातील युरोलॉजिस्ट स्पेशालिस्ट (Urologists specialist) म्हणून ख्याती असलेले, डॉ आशिष पाटील ( Dr Aashish Patil ) यांनी नंदुरबार जिल्ह्यातील पाटोळी येथील एका शेतकऱ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्याच्या पोटातून जवळपास (about one kg from the farmers stomach) एक किलो वजनाचा मुतखडा ( Dr Ashish Patil removed a lump )काढून त्या शेतकऱ्याला जीवनदान दिलंय .सध्या त्या शेतकऱ्याची प्रकृती उत्तम असल्याची माहीती डॉ. आशिष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉक्टर पाटील यांनी केलेल्या या शस्त्रक्रियेची दखल इंडिया बुक तसेच आशिया बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली आहे; लवकरच त्याची नोंद केली जाणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. आतापर्यंत मुतखड्यावरील जगभरात झालेली ही सर्वात मोठी शस्त्रक्रिया असल्याचा दावा डॉ. आशिष पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
डॉक्टर आशिष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील पाटोळी येथील ५० वर्षीय रमण चौरे हे गेल्या अनेक महिन्यांपासून मुतखड्याच्या आजाराने त्रस्त होते. बऱ्याच ठिकाणी जाऊन ही मुतखड्यावरील दुखण्याचे योग्य निदान होत नव्हते. अखेरीस त्यांनी धुळ्यातील डॉ.आशिष पाटील यांच्याकडे उपचार घेण्याचे ठरवले. मुतखड्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. धुळे शहरातील डॉ. आशिष पाटील यांच्या 'तेजनक्ष हॉस्पिटल' मध्ये एक तास ही शस्त्रक्रीया चालली. या शस्त्रक्रिये दरम्यान अथक परिश्रमातून शेतकऱ्याच्या कंबरेतून मुतखड्याला बाहेर काढण्यात यश मिळाल्याचे, डॉ. आशिष पाटीलयांनी स्वतः पत्रकार परिषदेत सांगितले.
" लिम्का बुक" ने घ्यावी दखल : मोठी शस्त्रक्रिया करून रुग्णाचे जीव वाचवले जातात या बद्दल कुणाचे दुमत नाही. मात्र अश्या शस्त्रक्रियेत रुग्णाकडून एक रुपया देखील न घेता , सरकारच्या कुठल्याच योजनेचा लाभ न घेता, सरकारच्या कुठल्याच योजनेचा लाभ न देता अश्या मोठ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे निशुल्क करणाऱ्या डॉक्टरांची ग्रिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडियाबुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी दखल घ्यायला हवी. अगोदरच दोन वर्ष कोरोना महामारीमुळे नागरिक त्रस्त होते. बहुतेकांचे रोजगार, नोकऱ्या गेल्यात, अश्यातच उपचार करायला देखील लोकांकडे पैसे नाहीत. देशात अजूनही काही डॉक्टर्स कुठलीही अपेक्षा न ठेवता रुग्णसेवा करताहेत; अशा डॉक्टरांची या "बुक" ने दखल घ्यायला हवी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केलीय.
हेही वाचा : Monkeypox Infection : मंकीपॉक्स संसर्गाबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक; जाणून घ्या मंकीपॉक्सबाबत सर्वकाही