धुळे - गणेश विसर्जनावेळी नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी धुळे जिल्ह्यातील साक्री येथील शिवदुर्ग प्रतिष्ठानच्या वतीने गणेश मूर्ती आणि निर्माल्य यांचे संकलन करण्यात आले आहे. शिवदुर्ग प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा... धुळ्यात दहाव्या दिवशी गणरायाला निरोप
मागील दहा दिवसांपासून सुरू असलेला गणेशोत्सवाचा अनंत चतुर्दशीला समारोप करण्यात येत आहे. सर्वत्र आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनावेळी विघ्नहर्ता गणरायाची मूर्ती नदीमध्ये विसर्जित करण्याची प्रथा आहे. तसेच या उत्सवादरम्यान संकलित झालेलं निर्माल्य देखील नदीमध्ये मूर्ती सोबत विसर्जित केले जाते, मात्र यामुळे नदीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं. हे प्रदूषण टाळण्यासाठी धुळे जिल्ह्यातील साक्री येथील शिवदुर्ग प्रतिष्ठानच्यावतीने यंदा प्रथमच मूर्ती आणि निर्माल्य संकलित करण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे.
हेही वाचा... सर्वत्र गणेश विसर्जनाचा उत्साह असताना लातुरात मात्र गणेश संकलन
सुमारे शंभराहून अधिक गणेश मूर्तींचे संकलन
शिवदुर्ग प्रतिष्ठानने सुरू केलेल्या या उपक्रमाला लोकांनीही चांगलाच प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. सुमारे शंभराहून अधिक गणेश मूर्ती यावेळी गणेशभक्तांनी शिवदुर्ग प्रतिष्ठानकडे सोपविल्या. या उपक्रमामुळे नदीचे प्रदूषण थांबण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे, त्यामुळे शिवदुर्ग प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.