ETV Bharat / state

विधान परिषद निवडणूक : धुळ्यात भाजपाचे पारडे जड; खडसे आणि गोटे यांचा कस लागणार... - धुळे विधान परिषद निवडणूक उमेदवार 2020

विधान परिषद निवडणुकीसाठी धुळे-नंदुरबार मतदारसंघात सरळ लढत आहे. भाजपाकडून अपेक्षेप्रमाणे अमरिशभाई पटेल हे उमेदवार आहेत. तर, महाविकास आघाडीने शहरातील अभिजीत मोतीराम पाटील यांना रिंगणात उतरविले आहे. भाई विरुद्ध अभिजीत पाटील असा मुकाबला दिसत आहे.

dhule mlc election 2020
धुळे विधान परिषद निवडणूक
author img

By

Published : Nov 18, 2020, 5:06 PM IST

धुळे - कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या विधान परिषद निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतर का होईना, फुटणार हे निश्चित झाले आहे. विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार १ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे ३ डिसेंबरला दिवाळी कोण साजरी करणार, हे स्पष्ट होईल.

उमेदवार कोण?

विधान परिषद निवडणुकीसाठी धुळे-नंदुरबार मतदारसंघात सरळ लढत आहे. भाजपाकडून अपेक्षेप्रमाणे अमरिशभाई पटेल हे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीने शहरातील अभिजीत मोतीराम पाटील यांना रिंगणात उतरविले आहे. भाई विरुद्ध अभिजीत पाटील असा मुकाबला दिसत आहे. मात्र, दुसरीकडे महाआघाडीच्या माजी मंत्री एकनाथराव खडसे, धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे आणि इतर नेत्यांचा लागणार आहे. एकनाथराव खडसे यांनी भाजपाची साथ सोडत राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधल्याने उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलतील, असा अंदाज लावला जात आहे. खडसे भाजपाला किती डॅमेज करतात? त्याची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.

खडसे यांचा बालेकिल्ला जळगाव जिल्हा मानला जात असला तरी उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील त्यांचा प्रभाव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

हेही वाचा - आमदार पडळकरांच्या भावासह १२ जणांवर गुन्हा दाखल, सांगली जिल्ह्यात मंदिरात चप्पल घालून आल्याचा वाद

पक्षीय बलाबल किती?

पक्षीय बलाबल पाहता आजच्या घडीला भाजपाचे पारडे काही प्रमाणात जड दिसत आहे. मात्र, असे दिसत असले तरी खडसेंना मानणारे आणि कुंपणावर असणाऱ्या मतदारांनी महाविकास आघाडीकडे उडी मारली तर, भाजपाचे म्हणजेच पर्यायाने अमरीशभाई पटेल यांच्या विजयाचे गणित बिघडू शकते. एकनाथ खडसे यांच्यासोबत धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनीही मनपातील भाजपाचे नगरसेवक तसेच जिल्हा परिषदेचे काही सदस्य आपल्या संपर्कात असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. तसेच मी भाजपा फोडू शकतो, अशी गर्जनाही केली होती. त्यामुळे त्यांनी केलेला दावा कितपत खरा आहे, हे निवडणुकीच्या निकालात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

त्यातच राज्यात महाआघाडीची सत्ता असल्याने काहीजण इकडून पक्षांतर करू शकतात. खडसे, गोटे यांच्यासह धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, नंदुरबारचे पालकमंत्री के. सी. पाडवी, शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरीष नाईक, आमदार कुणाल पाटील, पद्माकर वळवी हे आपल्याकडे खेचून विजयश्री महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकतील का? हे ३ डिसेंबरला स्पष्ट होईल.

असे आहे मतांचे समीकरण -

धुळे-नंदुरबार विधान परिषदेसाठी एकूण 438 मतदार आहेत. धुळ्यातून 238, नंदुरबारमधून 200 मतदार मतदान करू शकणार आहे. पक्षीय बलाबलाचा विचार करता भाजपाकडे धुळ्यात 169 तर, नंदुरबारमध्ये 70 अशी 239 मते आहेत. महाविकास आघाडीकडे धुळ्यात 69, नंदुरबारमध्ये 130, अशी 199 मते आहेत. तर एमआयएमकडे पाच मतांचा कोटा आहे. त्यामुळे आजच्या घडीला भाजपाचे पारडे जड दिसत आहे. मात्र, खडसे कोणती कमाल दाखवितात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.