धुळे - जिल्हा सत्र न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
वर्षानुवर्षे प्रलंबित असणारी प्रकरणे निकाली काढण्यासाठी धुळे जिल्हा सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. या लोकअदालत उद्घाटन प्रसंगी जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे, अॅड. दिलीप पाटील, धुळे महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह नागरिक, वकील आणि पक्षकार उपस्थित होते.
या लोकअदालतीत महापालिका, इन्शुरन्स कंपन्या, वीज वितरण कंपनी, यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रलंबित अशा प्रकरणांचा निकाल लावण्यात आला. लोक अदालतीमुळे प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने सुटण्यास मदत होते. यामुळे कोणीही दुःखी न होता समान न्याय मिळतो. आज अशा उपक्रमांची गरज निर्माण झाली आहे. याठिकाणी कोणावरही अन्याय होणार नाही, असे मत धुळे जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश मंगला धोटे यांनी यावेळी व्यक्त केले.